मोहम्मद सिराज किती श्रीमंत?BCCI कडून किती पगार मिळतो? सिराजची नेट वर्थ किती?
मोहम्मद सिराजनं इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत 23 विकेट घेतल्या. यामुळं सिराजच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. सिराजची नेटवर्थ गेल्या काही वर्षात वेगानं वाढली आहे. सिराज आज कोट्याधीश आहे.

सिराजला बीसीसीयकडून कोट्यवधी रुपये मिळतात. याशिवाय आयपीएलमधून मोठी कमाई होते. इंग्लंड विरुद्ध 23 विकेट घेतल्यानं सिराजची ब्रँडवॅल्यू वाढण्याची शक्यता आहे.

मोहम्मद सिराज 2024-25 साठी बीसीसीआयच्या ग्रेड ए च्या यादीत आहे. बीसीसीआय या यादीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये देते. याशिवाय प्रत्येक मॅचचं मानधन मिळतं. एका कसोटीसाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामना-7 लाख आणि टी-20 साठी 3 लाख रुपये मिळतात.

मोहम्मद सिराज सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. त्याला 2025 च्या आयपीएलमध्ये 12.25 कोटी रुपये मिळाले.

मोहम्मद सिराजनं 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. One Cricket नुसार मोहम्मद सिराजी नेटवर्थ 57 कोटी रुपये आहे. सिराजकडे जुबली हिल्स येथे अलिशान घर आहे. त्याची किंमत 13 कोटी रुपये आहे. तो विविध ब्रँडसच्या जाहिराती करतो. सिराजकडे अलिशान देखील कार आहेत.
येथे प्रकाशितः 08 ऑगस्ट 2025 12:04 एएम (आयएसटी)
क्रिकेट फोटो गॅलरी
आणखी पाहा
Comments are closed.