Abdominal Pain : ओटीपोटात वेदना, या आजाराचे लक्षण

साधारणपणे पोटात दुखायला लागल्यावर आपण काहीतर चरबट खाल्ले असेल, असा अंदाज लावतो. पण, दरवेळेला पोटदुखीमागे हेच कारण असेल असे नाही. यावर उपाय म्हणून घरगुती उपचार केले जातात. अगदी ओटीपोटातील वेदनेला साधी पोटदुखी समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण, तुमची ही सवय तुम्हाला महागात पडू शकते. ओटीपोटातील वेदनेमागे विविध आजार असू शकतात, असे तज्ज्ञमंडळी सांगतात. तज्ज्ञांच्या मते, ओटीपोटात सतत वेदना होत असतील आणि त्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर महिलेच्या एकूण आरोग्यावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आजच्या लेखात जाणून घेऊयात ओटीपोटात वेदना कोणत्या आजाराचे लक्षण असू शकते.

मासिक पाळी –

तज्ज्ञांच्या मते, महिलांमध्ये ओटीपोटात दुखण्यामागे विविध आजार असू शकतात. यातील सर्वात सामान्या म्हणजे मासिक पाळीदरम्यान वेदना.

एंडोमेट्रिओसिस –

एंडोमेट्रिओसिस हे कारण असू शकते. एंडोमेट्रिओसिसमध्ये गर्भाशयाचे अस्तर बाहेर वाढते. ज्यामुळे वेदना होता.

युरीनरी ट्रॅक आणि ब्लॅडर इन्फेक्शन –

ओटीपोटातल्या वेदनांकडे दुर्लक्ष केल्यास इन्फेक्शच होऊन मलावरोधाची समस्या उद्भवू शकते. तसेच आतड्यांना सूज येऊ शकते.

ओटीपोटातील वेदनेसह पुढील लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नये, असे तज्ज्ञ सांगतात.

  • वजन कमी होणे
  • अशक्तपणा
  • मलावरोध
  • अतिसार
  • शौचातून रक्त येणे
  • योनीतून जास्त स्त्राव येणे
  • ताप
  • वारंवार उलटी
  • उलटीतून रक्त पडणे
  • लघवीला न होणे
  • चक्कर येणे

अशी घ्या काळजी

  • मासिक पाळीत प्रायव्हेट पार्ट स्वच्छ करावेत.
  • अनियमित मासिक पाळी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • भरपूर पाणी प्यावे.
  • आहारातून शरीरात विविध पोषकतत्वे जातील याची काळजी घ्यावी.
  • इंटरकोर्स करताना सुरक्षितपणे करावे, जेणेकरून संक्रमण होणार नाही.
  • ताणपासून दूर राहण्यासाठी योग, ध्यान करावे.

 

हेही पाहा –

Comments are closed.