बॉम्बच्या अफवेने इंडिगोचे इमर्जंसी लँडिंग

इंडिगो एअरलाईन्सचे हैदराबाद येथे जाणाऱ्या 6 ई 68फ्लाईटमध्ये बॉम्बच्या धमकीचा मेल पाठवण्यात आला. त्यामुळे इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ सुरक्षेचा उपाय म्हणून ते विमान मुंबईकडे वळवत लँडिंग केले.

हैदराबाद एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे विमान जेद्दाहवरून हैदराबादकडे जाणार होते. त्यावेळी राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला धमकीवजा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये हैदराबाद येथे जाणाऱ्या 6 ई 68फ्लाईटमध्ये बॉम्ब असल्याची धमकीचा मेल होता. शनिवारी सकाळी हा मेल पाठवण्यात आला होता. एलटीटीई-आयएसआय ऑपरेटीव्हने 1984 मद्रास एअरपोर्ट मोडस ऑपरेटाव्ह स्टाईलने मोठा बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली होती. त्यावेळी इंडिगो एअरलाईन्सच्या अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणांवरून हे विमान मुंबईकडे लँडिंग केले. तपासानंतर ही अफवा असल्याचे समोर आले.

Comments are closed.