अडीच वर्षे पगारच मिळाला नाही! पाकिस्तानात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आर्थिक टंचाईला तोंड देणाऱ्या पाकिस्तानमध्ये असंतोष वाढत चालला आहे. तब्बल 28 महिने पगारच न मिळाल्याने सिंध प्रांतात शिक्षण विभागाचे कर्मचारी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. गेल्या 14 दिवसांपासून हे कर्मचारी हैदराबाद प्रेस क्लबच्या बाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. मात्र सरकारने त्यांना प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काही कर्मचाऱ्यांनी आता उपोषण सुरू केले आहे. सिंध सरकार जोपर्यंत कर्मचाऱ्यांची आतापर्यंतची थकबाकी देत नाही आणि पुढील पगार वेळेत मिळेल, असे आश्वासन देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलनाच्या नेत्यांनी दिला आहे.

Comments are closed.