पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश

अमृतसर

पंजाब पोलिसांनी सीमापार शस्त्रास्त्र तस्करी नेटवर्कचा मंगळवारी पर्दाफाश करत दोन जणांना अटक केली आहे. आरोपींची नावे गुरप्रीत सिंह उर्फ गोरी आणि विक्रमजीत सिंह उर्फ विक्की अशी आहेत. फिरोजपूर पोलिसांनी आरोपींकडून 6 ग्लॉक 9एमएम पिस्तुल, 4 मॅगजीन आणि 4 काडतुसे हस्तगत केली आहेत. आरोपी विक्रमजीत सिंहचे पाकिस्तानच्या एका तस्करासोबत थेट संबंध होते असे तपासात आढळून आले आहे.

Comments are closed.