सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड

सौदी अरबमध्ये मूल दत्तक घेण्याचा ट्रेंड दिसून येतोय. या वर्षी सौदीत 11 हजार कुटुंबांनी अनाथ मुलांना दत्तक घेतले.  नॅशनल फोस्टर केअर असोसिएशन आणि अल-विदाद चॅरिटी असोसिएशनने ही माहिती दिली. 2018 साली सुमारे 7400 सौदी कुटुंबांनी 8438 अनाथ मुलांचा सांभाळ केला. अल-विदाद चॅरिटी असोसिएशन ही सौदीमधील अनाथ मुलांचे सांभाळ करणारी एकमेव संस्था आहे. ही संस्था दत्तक घेणाऱ्या कुटुंबाला आणि मुलांना सामाजिक, मानसिक व शैक्षणिक मदत करते. सौदीमध्ये मूल दत्तक घेणे ही बाब धार्मिकदृष्टय़ा चांगली मानली जाते. सौदीत मूल जन्माला घालण्याऐवजी दत्तक घेण्याचा कल हळूहळू वाढत आहे.

Comments are closed.