जगदीप धनखर संघाशी संबंधित कार्यक्रमात सामील होईलSend fe

राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच करणार संबोधित

वृत्तसंस्था/ भोपाळ

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे 21 नोव्हेंबर रोजी भोपाळमध्ये एका संघ पदाधिकाऱ्याच्या पुस्तक प्रकाश सोहळ्याला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाच्या आयोजकांनी मंगळवारी यासंबंधी माहिती दिली आहे. जुलै महिन्यात उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यावर धनखड यांचे हे पहिले सार्वजनिक भाषण ठरणार आहे. यापूर्वी त्यांना वर्तमान उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात पाहिले गेले होते.

21 नोव्हेंबर रोजी रविंद्र भवन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी मनमोहन वैद्य यांचे पुस्तक ‘हम और यह विश्व’च्या प्रकाशन सोहळ्यात धनखड हे मुख्य वक्ते असणार आहेत. वृंदावन-मथुरा येथील आनंदमचे मुख्य पुजारी रितेश्वर महाराज देखील या कार्यक्रमात सामील होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

धनखड यांनी 21 जुलै रोजी आरोग्याचे कारण देत अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता. 12 सप्टेंबर रोजी राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्याच्या व्यतिरिक्त ते सार्वजनिक स्वरुपात कुठेच दिसून आले नव्हते. धनखड यांच्या अचानक राजीनाम्यावर काँग्रेसने प्रश्न उपस्थित केले आहेत.

 

Comments are closed.