Beed : वाळू माफीयांची दहशत; बीडच्या सीना नदी पात्रातील वाळू उपसा थांबविल्याने शेतकऱ्यावर हल्ला
बीड क्राईम न्यूज : बीडच्या आष्टी (Ashti) तालुक्यातील वाकी परिसरात वाळू माफियांची (Sand Mafia) दहशत पहायला मिळालीहे. नऊ जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्यावर तसेच त्याच्या घरासह वाहनांवर हल्ला (Crime News) करण्यात आला. वाकी परिसरात असलेल्या सीना नदी पात्रात अवैधरित्या वाळू वाहतूक सुरू होती. याच दरम्यान नदी शेजारील असलेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार रोखला. त्यामुळे संतप्त झालेल्या टोळक्याने दोघा शेतकऱ्यांवर हल्ला चढवला. हल्लेखोर यावरच थांबले नसून शेतकऱ्याच्या घरावर पाण्याच्या प्लांटवर आणि वाहनांवर लाठ्या काठ्याने हल्ला चढविण्यात आला. या प्रकरणात एकूण नऊ जणांविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Beed Crime News : आरोपींना अटक करून न्याय द्यावा, शेतकऱ्याची मागणी
दरम्यान या कमीत्यामुळे वाळू माफियांच्या दहशतीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करून न्याय द्यावा, अशी मागणी हल्ला झालेल्या शेतकऱ्याने केली आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा शहरातील गुन्हेगारीचा समस्या चर्चात्यामुळे आला आहे. या प्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत असून आरोपींचा देखील शोध पोलीस घेत आहे.
Raigad Crime : जनावरांना बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन पळविणाऱ्या टोळीला अटक
रायगडच्या पेण पोलिसांनी जनावरे पळविणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केलाय.ही टोळी जनावरांना बेशुध होण्याचे इंजेक्शन देऊन वाहनातून पळवून न्यायचे मात्र पेण पोलिसांनी यशस्वी सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश करून एकूण 5 जणांना ताब्यात घेतलं आहे तर 1 आरोपी घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती मिळाली आहे. पेण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत एक महिद्रा झायलो वाहन एक सुझुकि कंपनीची ईको आणि या दोन्ही वाहनांमधील एकूण 4 जनावरे ताब्यात घेतली आहेत.
Raigad Crime News : सापळा रचून या टोळीचा पर्दाफाश, एकूण 5 जणांना घेतलं ताब्यात
या प्रकरणी आरोपी शफिक रफिक अन्सारी 25 वर्ष, इम्रान मलंग पटेल वय- 36 वर्षे(मुब्रा ठाणे), सलमान अब्दुल अहमद पटेल वय – 36 वर्षे, सोनु जुबेर खान वय-22 वर्षे, बाजल राशिद शेख वय-16 वर्षे (पनवेल) यांना पेण पोलिसांनी अटक केली आहे. तर अजिज शेख रा.तळोजा हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संदिप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.