काकांच्या पोटात गुप्ती खुपसताच उत्तम मोहितेंचा पुतण्या शाहरुख शेखवर धावून गेला, एक जीवघेणा वार
सांगली हत्येची बातमी सांगली शहरातील गारपीर चौकात मंगळवारी रात्री दुहेरी हत्याकांड झाले. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सांगलीतील दलित महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव मोहिते (Uttam Mohite) यांची काल त्यांच्याच वाढदिवसाच्या पार्टीत निर्घृणपणे हत्या (Murder news) करण्यात आली. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी एका हल्लेखोराचाही या घटनेदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सध्या सांगलीत शहरात (Sangli News) तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गारपीर चौकाच्या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
उत्तमराव मोहिते यांचा मंगळवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने गारपीर चौकात असलेल्या त्यांच्या घरापासून काही अंतरावरच जंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी मांडव टाकून पाहुण्यांची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील अनेक मान्यवर या कार्यक्रमाला आले होते. शाहरुख शेख उर्फ शब्या हादेखील आपल्या आठ ते दहा साथीदारांसह याठिकाणी आला होता.
हे सर्वजण या कार्यक्रमात आल्यानंतर सगळ्यांनी आधी जेवणावर ताव मारला. त्यानंतर उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी हे सर्वजण त्यांच्याजवळ जातात या सगळ्यांना त्यांच्याकडील धारदार हत्यारं बाहेर काढली. एका गुप्तीने उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर सपासप वार करण्यात आले. इतरांना उत्तम मोहिते यांच्यावर तलवारीचे वार केले. यावेळी उत्तम मोहिते यांनी जवळच असलेल्या आपल्या घरात धाव घेतली. मात्र, हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत घराच्या आत जाऊन त्यांना मारले. काही कळण्यापूर्वीच उत्तम मोहिते यांच्यावर सपासप वार झाल्याने त्यांचा देह रक्तबंबाळ झाला आणि ते खाली कोसळले. यामुळे उत्तम मोहिते यांचा पुतण्या संतापला आणि त्याने आपल्या काकांवर वार करणाऱ्या शाहरुख शेख याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला. हा घाव शाहरुख शेखच्या पायावर बसला आणि प्रचंड रक्तस्राव सुरु झाला. त्यानंतर उत्तम मोहिते यांचे इतर समर्थकही हल्लेखोरांवर तुटून पडले आणि जमावाने शाहरुख शेखला बेदम मारहाण केली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. हल्ला करणारे तरुण ड्रग्जच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. याच नशेखोरीमुळे सांगलीत गुन्हेगारी वाढत असल्याचेही त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’ स्टाईल हत्या, वाढदिवसाला आले अन् गुप्तीने सपासप वार करुन संपवलं
आणखी वाचा
Comments are closed.