अक्षर, नितीश OUT, ध्रुव, वॉशिंग्टन IN..; द. अफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाची कशी असेल Playing XI?


भारत विरुद्ध एसए पहिली कसोटी: भारत आणि दक्षिण अफ्रिका (India vs South Africa) यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. यामधील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. कोलकातामधील ईडन गार्डन्स मैदानावर भारत आणि दक्षिण अफ्रिकेचा पहिला सामना (India vs South Africa 1st Test) खेळवला जाईल. 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील भारताची ही तिसरी कसोटी मालिका असणार आहे. दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिची प्लेईंग इलेव्हन कशी असेल, जाणून घ्या…

पहिल्या कसोटीसाठी भारताची संभाव्य Playing XI- (Ind vs SA 1st Test Playing XI)

यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा कसोटी संघ- (India Test Squad vs South Africa 2025 Test)

शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक, उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप.

WTC च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर- (WTC Points Table)

ऑस्ट्रेलिया सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत आणि त्यांची गुणांची टक्केवारी 100 आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी आतापर्यंत दोन सामन्यांपैकी एक जिंकला आहे आणि एक अनिर्णित राहिला आहे. श्रीलंकेची गुणांची टक्केवारी 66.67 आहे. भारतीय संघाने आतापर्यंत सात सामने खेळले आहेत, ज्यात चार जिंकले आहेत, दोनदा पराभव पत्करला आहे आणि एक अनिर्णित राहिला आहे. भारतीय संघाची गुणांची टक्केवारी सध्या 61.90 आहे. गतविजेता दक्षिण आफ्रिका सध्या 50 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs SA Schedule)

पहिली कसोटी: 14-18 नोव्हेंबर (ईडन गार्डन्स)

दुसरी कसोटी: 22-26 नोव्हेंबर (एसीए स्टेडियम)

पहिला एकदिवसीय सामना: 30 नोव्हेंबर (जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम)

दुसरा एकदिवसीय सामना: 3 डिसेंबर (शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम)

तिसरा एकदिवसीय सामना: 6 डिसेंबर (एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम)

पहिली टी-20: 9 डिसेंबर (बारबती स्टेडियम, कटक)

दुसरा T20: 11 डिसेंबर (PCA स्टेडियम)

तिसरा T20: 14 डिसेंबर (HPCA स्टेडियम)

चौथी टी-20: 17 डिसेंबर (एकाना स्टेडियम)

पाचवी टी-20: 19 डिसेंबर (नरेंद्र मोदी स्टेडियम)

संबंधित बातमी:

ICC WTC: जय शाहांच्या अध्यक्षतेखाली ICC मोठा निर्णय घेणार; WTC स्पर्धा आता नवीन स्वरुपात खेळवली जाणार

आणखी वाचा

Comments are closed.