दिंडीत कंटेनर घुसला; महिला ठार, नऊ जखमी; संतप्त वारकऱ्यांचा रास्ता रोको

तुकारामाच्या गजरात आळंदीकडे पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये आज सकाळी कंटेनर घुसल्याने वारकरी महिला जागीच ठार झाली तर अन्य नऊ वारकरी जखमी झाले असून त्यांना कामशेत येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान कंटेनरच्या मृत प्रियांका तांडेल घुसखोरीविरोधात संतप्त वारकऱ्यांनी कामशेतच्या महामार्गावरच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे लोणावळ्यापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती.

उरणच्या करळ तसेच पनवेल परिसरातील असंख्य वारकरी आळंदीच्या दिशेने जात होते. टाळमृदुंगाचा गजर आणि ज्ञानदेवांच्या भेटीची आस यामुळे वारकऱ्यांचे देहभान हरपले होते. ही दिंडी सवासातच्या सुमारास कामशेत येथून जात असताना अचानक एक कंटेनर या दिंडीत घुसला. त्यामुळे एकच पळापळ सुरू झाली. या भीषण अपघातामध्ये करळ येथील प्रियांका तांडेल (५४) ही महिला ठार झाली. रस्ता ओलांडत असताना तिला जोरदार धडक बसली.

या अपघातामध्ये पाच वारकरी भाविक जखमी झाले. त्यांच्यावर कामशेतच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मोठा अपघात होऊन दोन तास उलटले तरी कोणीही अधिकारी न फिरकल्याने वारकऱ्यांचा संताप अनावर झाला आणि महामार्गावरच त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली. पाथरगावच्या उतारावर ही दुर्घटना घडली. सोमवारी रात्री मुक्कामी असलेली दिंडी महामार्गावरून जात असताना हा अपघात झाला. सुमारे सवाशेच्या वर वारकरी या दिंडीमध्ये होते.

चालक अटकेत

चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर वारकऱ्यांच्या दिंडीमध्ये घुसला. या अपघाताला जबाबदार असलेल्या चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र त्याचे नाव समजू शकले नाही. अपघातामध्ये चालकही जखमी झाला असून मृत महिलेच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करावी व चालकाला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी समस्त वारकऱ्यांनी केली आहे.

Comments are closed.