दिल्लीत कारच्या स्फोटाने भारत हादरला, 12 जणांचा मृत्यू; पाकिस्तानच्या मीडियाने काय म्हटलं?
दिल्ली कार स्फोट बातम्या: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटात (Delhi Car Blast News) आतापर्यंत 12 जणांचा मृ्त्यू झाला आहे. दरम्यान, दिल्लीतील स्फोटाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. हा स्फोट आत्मघाती हल्ला नव्हता अशी माहिती तपासात हाती आलीय. एनआयएने काल तपासाची सूत्र हाती घेतल्यावर या संदर्भातील प्रत्येक पैलूचा विस्तृत शोध घ्यायला सुरूवात केलीय. त्यात एनआयएला आत्मघाती हल्ल्याची कोणतीही शक्यता आढळलेली नाही. स्फोटकं पकडली जातील या भीतीने घाबरून स्फोट घडवला असं दिसतंय.
बॉम्ब पूर्णपणे तयार झाला नव्हता. केवळ कच्चा स्फोटकांचा स्फोट घडवला अशी सूत्रांची माहिती आहे. स्फोट झाल्यावर कोणताही मोठा खड्डा पडला नाही, परिसरात कुठेही खिळे, छर्रेही आढळले नाहीत. त्यावरून बॉम्ब तयार झाला नव्हता अशा निष्कर्षाप्रत तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे. दिल्ली एनसीआर, पुलवामा, फरिदाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात छापेमारी सुरू केली होती. 9 आणि 10 नोव्हेंबरला दिल्लीलगत हरयाणातील फरिदाबादमध्ये छापेमारीत 3000 किलो स्फोटकं, डिटोनेटर, टायमर, बॉम्ब बनवण्याची सामग्री छाप्यात जप्त केली होती. त्यामुळे दबाव वाढला आणि त्यामुळे घाबरून स्फोट घडवल्याची माहिती आहे. दरम्यान, दिल्लीतील स्फोटावर (Pakistan On Delhi Blast) जगभरात चर्चा झाली. यावेळी पाकिस्तानच्या मीडियाने दिल्लीतील स्फोट प्रकरणात नेमकं काय म्हटलंय, हेही समोर आले आहे.
पाकिस्तानमधील द डॉन वृत्तपत्राने काय म्हटलंय?
पाकिस्तानची सुप्रसिद्ध इंग्रजी वाहिनी, द डॉनने वृत्त दिले की, दिल्ली पोलीस दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कार बॉम्बस्फोटाची चौकशी करत आहेत. गेल्या दशकात (10 वर्षांमध्ये) दिल्लीत झालेला हा सर्वात मोठा स्फोट आहे.
पाकिस्तानमधील जिओ न्यूजने काय म्हटलंय?
जिओ न्यूजनेही दहशतवादाचा दृष्टिकोन अधोरेखित केला आणि दिल्ली पोलीस कार बॉम्बस्फोटाची चौकशी दहशतवादी हल्ला म्हणून करत आहे, असा मथळा प्रकाशित केला.
पाकिस्तानमधील द एक्सप्रेस ट्रिब्यूनने काय म्हटलंय?
द एक्सप्रेस ट्रिब्यूनने लिहिले की, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एक कार बॉम्ब स्फोट झाला आहे. काही जणांचा मृत्यू झाला आहे आणि 20 जण जखमी झाले आहेत. मुंबई आणि उत्तर प्रदेशसह अनेक भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
पाकिस्तानमधील द न्यूज इंटरनॅशनलने काय म्हटलंय?
इतर वाहिन्यांप्रमाणे, पाकिस्तानच्या वृत्तवाहिनी, द न्यूज इंटरनॅशनलनेही दहशतवादावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी वाचकांना माहिती दिली की कार बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे आणि दिल्ली पोलीस दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहेत. दिल्लीसह अनेक भागात सुरक्षा दलांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानमधील पाकिस्तान टुडेने काय म्हटलंय?
स्फोटानंतर ‘पाकिस्तान टुडे’ म्हटलं की, दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ स्फोटात काही जणांचा मृत्यू, 20 जण जखमी. या वृत्तात दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांचे निवेदन देखील समाविष्ट होते, ज्यांनी म्हटले होते की स्फोटामुळे जवळच्या वाहनांनाही आग लागली. कारचा माजी मालक सलमान याची चौकशी केली जात आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.