विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर…
रोहित शर्मा विराट कोहली नवी दिल्ली: भारतीय दिग्गज रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) आता टीम इंडियासाठी फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळतात. दोन्ही खेळाडूंनी कसोटी आणि टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्माने टी-20 फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर 2025 मध्ये आयपीएलदरम्यान, रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधूनही निवृत्ती होण्याचा निर्णय जाहीर केला. आता दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या (Ind vs SA) एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली टीम इंडियाकडून पुन्हा खेळताना दिसेल. मात्र याआधी बीसीसीआयने (BCCI) रोहित शर्मा आणि विराट कोहलीला थेट इशारा दिला आहे.
बीसीसीआयच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहलीला (Virat Kohli) स्पष्टपणे सांगितले आहे की जर त्यांना भारताकडून खेळायचे असेल तर त्यांनी देशांतर्गत क्रिकेट खेळले पाहिजे. दोन्ही खेळाडूंनी टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असल्याने, फिट राहण्यासाठी दोघांना देशांतर्गत क्रिकेट खेळणे महत्त्वाचे आहे. रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) कडे उपलब्ध असल्याचं निश्चित केलं आहे, परंतु विराट कोहली देशांतर्गत खेळणार की नाही अद्याप कोणतीही स्पष्टीकरण दिलेलं नाहीय.
रोहित अन् विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळलेली- (Rohit Sharma Virat Kohli)
रोहित आणि विराट दोघांनीही अलीकडेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भाग घेतला होता. रोहित शर्माच्या बॅटने शानदार कामगिरी केली. रोहित शर्माने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात शतक ठोकले. सलग दोन एकदिवसीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहली तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात 74 धावा करून नाबाद राहिला. रोहित शर्माने संपूर्ण मालिकेत सर्वाधिक धावा 202 केल्या, ज्यामुळे त्याला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला.
भारत अन् दक्षिण अफ्रिकेत रंगणार मालिका- (Ind vs SA)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका 30 नोव्हेंबरपासून रंगणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 30 नोव्हेंबर रोजी खेळला जाईल, त्यानंतर दुसरा 3 डिसेंबर रोजी आणि तिसरा 6 डिसेंबर रोजी होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. तथापि, भारताची घरच्या मैदानावर ही मालिका असल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळण्याची अपेक्षा आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.