शॉकींग! लग्नात विघ्न, स्टेजवरच नवरदेवावर हल्ला, नवरीला चक्कर; घटनेचा व्हिडिओ ड्रोनमध्ये कैद


अमरावती: लग्नकार्यात (Marriage) गोंधळ किंवा पाहुणे मंडळींचा रुसवा फुगवा ही साधारण गोष्ट असते, मात्र अमरावतीमधील (Amravati) एका लग्नसमारंभात चक्क नवरदेवावरच जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. अमरावतीच्या बडनेरा रोडवरील साहिल लॉनमध्ये सुरू असलेल्या लग्नसमारंभात काल रात्री अचानक गोंधळ उडाला. साहिल लॉन येथे बडनेरा येथील सुजल समुद्रे याचा विवाह समारंभ सुरू असताना दोन युवकांनी नवरदेव सुजल समुद्रे याच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. या हल्ल्याचे ड्रोन व्हिडिओ समोर आले आहेत. या हल्ल्यात नवरदेव सुजल हा जखमी झाला असून नववधू आणि नवरदेवाची आई दोघेही चक्कर येऊन घटनास्थळीच पडल्याची माहिती आहे. या घटनेनं लग्न समारंभात आणि पै पाहुण्यात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

हल्लेखोरांनी नवरदेवावर भरस्टेजवर हल्ला करुन मंगल कार्यालयातून पळ काढला. त्यावेळी, नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांना आरोपींना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्यावर देखील आरोपीने चाकू हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच, आरोपी दुचाकी वाहनावर बसून पळून गेले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ ड्रोन कॅमेरात कैद झाला आहे. या हल्ल्यात नवरदेव गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आज त्याएस रुग्णालयातून घरी आणण्यात आले. मात्र, या घटनेमुळे लग्नात मोठं विघ्न आलं. समुद्र कुटुंबातयांनी हा विवाह थांबवला असून संपूर्ण कुटुंब दहशतीच्या सावाखाली आहे.

नवरदेवाचे वडील राम समुद्रे यांनी एबीपी माझाशी बोलतांना सांगितले की, काही दिवसांआधी माझ्या मुलाच बडनेरामध्ये राहणाऱ्या दोन युवकासोबत बाचाबाची झाली होती. तेव्हा, त्या दोन्ही आरोपींनी धमकी दिली होती च्या तुझ्या लग्नात येऊन लग्नात धिंगाना करू, काल हल्ला झाल्यावर आम्ही भीतीपोटी लग्न थांबवलं आहे. जोपर्यंत पोलीस आरोपींना पकडून कडक शिक्षा करत नाहीतर, तोपर्यंत आम्ही दहशतीच्या सावताखालीच राहणार, त्यामुळे, पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणीही नवरदेवाचे वडिल राम समुद्रे यांनी केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून आता लग्नकार्यासारख्या मंगलमय, शुभ प्रसंगीही भीती अन् दहशतीच्या सावटाखाली राहावे लागेल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.

हेही वाचा

Ajit Pawar: अजित दादांकडे सुप्रिया सुळेंचा प्रस्ताव, एकत्र येण्यावर संवाद; राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.