सतत तारखा देऊन केसेसवर सुनावणी न होणे न्यायव्यस्थेवरील लोकांचा विश्वास हादरवून टाकणारे, असीम सरोदेंचे मत

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयातील अंतिम सुनावणी होणार होती. मात्र खंडपीठापुढे कार्यतालिकेतील 19 व्या क्रमांकावर ही सुनावणी होणार होती. दरम्यान शिवसेनेची बाजू मांडणारे विधिज्ञ असीम सरोदे यांनी ट्विटरवरून ही सुनावणी होईल की नाही याबाबत शंका व्यक्त केली होती. त्याबाबत पुन्हा एकदा त्यांनी ट्विट करत न्यायव्यवस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर आपले मत मांडले.
अश्या व्यंगचित्रांमधून लोकभावना व्यक्त होतात तेव्हा विलंबित पद्धतीने चालणाऱ्या न्याय प्रक्रियेतील आजारावर उपाय करण्याची निकड घेणे आवश्यक असते.
सतत तारखा देऊन केसेसवर सुनावणी न होणे हे न्यायिक गलथानपणाचे व न्यायव्यस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास हादरवून टाकणारे ठरते. pic.twitter.com/21yGWaKjSw
– असिम लार 12 नोव्हेंबर 2025
असीम सरोदे यांनी मार्मिक साप्ताहिकाचे मुखपृष्ट शेअर करत न्यायव्यवस्थेतील सध्याच्या परिस्थितीवर टिपण्णी केली आहे. ”अशा व्यंगचित्रांमधून लोकभावना व्यक्त होतात तेव्हा विलंबित पद्धतीने चालणाऱ्या न्याय प्रक्रियेतील आजारावर उपाय करण्याची निकड घेणे आवश्यक असते. सतत तारखा देऊन केसेसवर सुनावणी न होणे हे न्यायिक गलथानपणाचे व न्यायव्यस्थेवरील सामान्य लोकांचा विश्वास हादरवून टाकणारे ठरते”, असे सरोदे यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.
सरोदे यांनी आणखी एक ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. ”न्यायालयाचा अवमान करता का? न्यायव्यस्थेवर ताशेरे ओढून संविधानिक संस्थेचा अपमान करता का? असं म्हणून मुख्य मुद्द्याला बगल देणे भारताला परवडणारे नाही. आपल्या व्यवस्थांमधील उणिवा आणि चुका शोधून त्या दुरुस्त करणे अशी प्रक्रिया म्हणजे लोकशाही असते” असे सरोदे म्हणाले.

Comments are closed.