Bathroom Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार बाथरूम कसे असावे? वाचा सविस्तर माहिती
घर बांधताना गरजेची गोष्ट असणाऱ्या बाथरूमसाठी सर्वात कमी जागा आणि कमीत कमी लक्ष दिले जाते. पण, वास्तुशास्त्रानुसार बाथरूम ही एक शक्तीशाली जागा आहे, जी घराच्या ऊर्जेवर परिणाम करते. संपूर्ण घरापैंकी बाथरूममध्ये सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जा जमा होते. त्यामुळे बाथरूमची दिशा, तेथील वस्तू योग्य दिशेला असणे गरजेचे असते. त्यामुळे बाथरूमसंबंधित वास्तु टिप्स जाणून घेऊयात.
- वास्तुशास्त्रामते बाथरूम पाणी आणि कचऱ्याशी संबंधित असल्याने त्याचे स्थान योग्य दिशेला असणे महत्त्वाचे असते. बाथरूम आणि शौचालय घराच्या दक्षिण किंवा नैऋत्य भागात असले पाहिजे. यामुळे घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर निघण्यास मदत होते. तसेच इतर खोल्यांमधील सकारात्मक ऊर्जेवर त्याचा परिणाम होत नाही.
- बाथरूमचा दरवाजा पूर्वेला किंवा उत्तरेला असावा जेणेकरून ऊर्जा आत येते. एक गोष्ट सर्वात महत्त्वाची बाथरूमचा दरवाजा थेट स्वयंपाकघरात किंवा देव्हाऱ्याजवळ उघडणार नाही याची काळजी घ्यावी.
हेही वाचा – आई वडील नसतील तर मुलीचे कन्यादान कोणी करावे?
- वास्तुशास्त्रानुसार पाणी हे संपत्तीचे प्रतीक आहे. त्यामुळे बाथरूममध्ये पाण्याच्या प्रवाहाची योग्य दिशा सुनिश्चित करावी. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राखण्यासाठी पाणी उत्तर किंवा पूर्वेकडे वाहणे गरजेचे आहे. जर घरात गळणारे किंवा पाणी टपकणारे नळ असतील तर ताबडतोब दुरुस्त करावेत.
- बाथरूमसाठी पांढरा, हलका निळा किंवा हिरवा रंग शुभ असतो. हे रंग शांती, स्वच्छता आणि ताजेपणाचे प्रतीक आहेत. गडद रंग ऊर्जेत अडथळा आणू शकतात.
- नियमितपणे आरश्यांची स्वच्छता राखावी. आरसे देखील सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजवतात. आरसे तुटलेले नसावेत.
हेही वाचा – हिंदू धर्मात शुभ प्रसंगाची सुरूवात नारळ फोडून का केली जाते?
Comments are closed.