Saffron : स्वादासाठीच नाही आरोग्यासाठीही फायदेशीर आहे केशर
केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. केशरला ‘Red Gold’ असे देखील म्हटले जाते. केशरला हिंदीत ‘केसर’, तमिळ आणि अरबी भाषेत ‘कुंकुमापू’ आणि बंगाली भाषेत ‘जफरन’ अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. केशरचे सर्वात जास्त उत्पादन इराण येथे होते तर भारताचा यात जगात तिसरा क्रमांक लागतो. लहानपणी सणासुदीच्या वेळी श्रीखंडात किंवा मसाला दुधात केशराचा वापर केला जात असे. पण, हल्ली अनेक पदार्थांमध्ये केशर वापरले जाते. केशर अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. त्यामुळे केशर स्वादासाठी नाही तर आरोग्यासाठीही वरदान समजले जाते. जाणून घेऊयात केशर आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहे.
केशराचे फायदे –
- केशरमधील कॅरोटीनॉइड्स रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. ज्यामुळे लहान-सहान आजारांशी लढण्यास मदत होते.
- दृष्टी सुधारण्यासाठी केशर उपयुक्त आहे. केशरमधील ऍटीऑक्सिंडट्स डोळ्यांतील रक्तप्रवाह सुधारतात. परिणामी, दृष्टी सुधारते.
- केशरमध्ये कॅन्सरशी लढण्याची ताकद आहे. केशरातील गुणधर्म क्रोसिन आढळतो. क्रोसिन शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट करते आणि नवीन पेशी तयार होण्यास प्रतिबंध करते.
हेही वाचा – Feminine Hygiene Tips : शरीराच्या प्रायव्हेट पार्ट्सची स्वच्छता महत्त्वाची का?
- केशर भूक कमी करून कॅलरीज आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करते. ज्यामुळे हृदयरोग, लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका कमी होतो.
- गरोदर महिलांना बाळाच्या वाढीसाठी केशर उपयुक्त असते. यामुळे स्तनदा मातेचे दूध वाढते.
- केशराचा वापर सौंदर्यवर्धक प्रसाधनांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो.
- केशराच्या सेवनाने मूड सुधारतो. त्यामुळे केशर नैराश्यावर पारंपरिक उपचार आहे.
- केशराच्या सेवनाने निद्रानाशापासून आराम मिळतो आणि चांगली झोप लागते.
- मासिक पाळीत उद्भवणाऱ्या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी केशर उपयुक्त ठरते. तुम्ही या दिवसात केशराचे दूध किंवा केशराचा चहा प्यायला हवा.
- बदलत्या हवामानात दम्याचा त्रास वाढला असेल तर केशर दुधात मिसळून प्यावे.
- केशराच्या सेवनाने हाडांशी संबंधित सर्व प्रकारच्या आजारांवर मदत होते.
- कोणत्याही प्रकारची दुखापत झाल्यास किंवा त्वचा भाजली असेल तर त्याजागी केशराची पेस्ट तयार करून लावावी.
(ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. ‘Tezzbuzz.com’ आणि ‘Only मानिनी’ या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
हेही वाचा – Baby Care Tips: थंडीत बाळाला दररोज अंघोळ घालावी का? जाणून घ्या बालरोगतज्ञांचा सल्ला
Comments are closed.