हर्षित राणाला गंभीरकडून वारंवार संधी का मिळते? KKRच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा समोर
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाला (Harshit Rana) अनेकदा सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं. कारण चाहत्यांचं असं मत आहे की, तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांचा “फेव्हरेट” खेळाडू आहे आणि त्यामुळेच त्याला संघात वारंवार संधी दिली जाते.
गंभीर यांनी या विषयावर अनेक वेळा स्पष्टीकरण दिलं असलं तरी चर्चा थांबलेली नाही. आता कोलकाता नाईट रायडर्स (KKR) च्या माजी खेळाडूने या वादावर मोठं वक्तव्य केलं आहे.
टीम इंडियामध्ये हर्षित राणाच्या निवडीवरून गौतम गंभीर यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. यूट्यूबवरील इंडियन क्रिकेट कॅन्टीन या चॅनेलशी बोलताना माजी खेळाडू मनविंदर बिस्ला म्हणाले, जे लोक हर्षित राणाच्या निवडीचा विरोध करत आहेत, ते बहुतेक केकेआरचे खरे फॅन नाहीत.
लोकांना वाटतं की, गौतम गंभीरचा केकेआरशी संबंध असल्यामुळे ते हर्षितचा सपोर्ट करतात, पण असं काही मामा-चाचाचं नातं नाहीये. लोकांनी फक्त सोशल मीडियावर एक कथा तयार केली आहे.
सिडनीत भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला, तेव्हा सोशल मीडियावर सगळीकडे फक्त रोहित आणि विराटचीच चर्चा झाली. पण कुणी हर्षितबद्दल बोललं का? जर त्याने सुरुवातीला विकेट्स घेतल्या नसत्या, तर भारत जिंकला असता का?
Comments are closed.