ह्रदयद्रावक… नाशिकवरुन मुंबईत फिरायला आला, उंच इमारतीवरुन सळई कोसळल्याने युवकाचा मृत्यू झाला
मुंबई : शहरातील जोगेश्वरी परिसरात बांधकाम इमारतीमधून (Building) सिमेंट ब्लॉक डोक्यावर पडल्याने 19 वर्षीय संस्कृतीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्वेत मरोळ नाका परिसरात सुद्धा बांधकाम इमारतीमधून लोखंडी रॉड कोसळून एका व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मरोळ नाका मेट्रो स्टेशनखाली प्रिव्हिलॉन या विकासकाकडून सुरू असलेल्या बांधकाम इमारतीच्या संदर्भाने ही दुर्घटना घडली. सध्या येथे बांधकामाधीन इमारतीचे काम सुरू आहे. याच बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरुन लोखंडी रॉड खाली पडल्याने एका 30 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नाशिकवरुन मुंबईत फिरण्यासाठी आलेल्या 30 वर्षीय व्यक्ती अमर आनंद पगारे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विशेष म्हणजे आज सकाळीच ते मुंबईत पोहोचले होते, 11 च्या सुमारास येथील मरोळ नाश झाला की वातावरणात नाक मुरडत आहे. मरोळ नाका परिसरामध्ये यावेळी प्रिव्हिलॉन या विकासाकाकडून सुरू असलेला बांधकाम इमारतीच्या सातवा मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील कूपर रुग्णालयात पाठवला आहे.
मुंबईत सातत्याने बांधकाम इमारतीमधून दगड आणि लोखंडी रॉड पडून लोकांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडत आहे. त्यामुळे, कधी गुन्हेगारीने, कधी अपघाताने, कधी बॉम्बस्फोटाने असुरक्षित वाटणारी मुंबई आता उंच इमारतींच्या बांधकामानेही असुरक्षित वाटू लागली आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांतही भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. बांधकाम इमारतीच्या सुरक्षाव्यवस्था राम विश्वास आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांकडून विचारला जात आहे. सध्या या घटनेमध्ये चूक कोणाची आहे, कशामुळे ही घटना घडली? यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
मुलुंड पोलिसांकडून आंतरराज्य टोळीचा उघड
परदेशी नागरिकांना कर्ज देण्याच्या बहाण्याने लुटणाऱ्या एका आंतरराज्य टोळीचा उघड मुलुंड पोलिसांनी केला आहे. मुलुंडमधील कॉलनी परिसरात हे रॅकेट कार्यरत होते. इंटरनॅशनल नंबरचा वापर करत ही टोळी त्यांच्याकडे असलेल्या डेटाबेसच्या माध्यमातून अमेरिका आणि कॅनडामधील नागरिकांना संपर्क साधायचे आणि त्यांना त्वरित कर्ज मिळवून देण्यासाठी प्रक्रिया करत आहे फी आकारली जायची, ही प्रक्रिया करत आहे नामनिर्देशित शुल्क स्टोअर्सच्या भेट व्हाउचर्सच्या माध्यमातून आकारली जायची. ज्यावेळी एखादा नागरिक यांच्या जाळ्यात यायचा त्यावेळी त्याच्याकडून मिळालेले भेट व्हाउचर हे सुरतमधील रॅकेट चालविणाऱ्या प्रशांत राजपूत याला दिले जायचे. एका विश्वसनीय सूत्राच्या माहितीच्या आधारावर मुलुंड पोलिसांनी कॉलनी परिसरात असलेल्या या कॉल सेंटरवर धाड मारली आणि सागर गुप्तासह अभिषेक सिंग, तनय गडगडणेशैलेश शेट्टी आणि रोहन अन्सारी यांना अटक केली. सध्या सुरतच्या प्रशांत राजपूत या आरोपीचा शोध सुरू आहे.
हेही वाचा
इंस्टाग्रामवरची ती निघाला तो, धरणाजवळ बोलवून मारहाण; मनसे तालुकाध्यक्षासह तिघांना अटक
आणखी वाचा
Comments are closed.