IND vs SA: गावस्कर-कोहलीचा विक्रम मोडण्याच्या उंबरठ्यावर शुबमन गिल! ईडन गार्डन्सवर इतिहास रचणार?

भारतीय संघ 14 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA) 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळण्यासाठी उतरणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी भिडण्यासाठी सज्ज आहे. कोलकात्यात शुबमन गिलला एक नव्हे तर दोन विक्रम मोडून इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे. भारतीय कर्णधाराकडे विराट कोहली आणि सुनील गावस्कर यांच्या विक्रमांना मागे टाकत इतिहास घडवण्याची संधी आहे.

गिल जेव्हापासून भारतीय कसोटी संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून त्याने शानदार फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता तो कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वात जलद 1000 धावा पूर्ण करणारा भारतीय खेळाडू बनण्याच्या उंबरठ्यावर आहे. गिलने आतापर्यंत 7 कसोटी सामन्यांच्या 13 डावांमध्ये 78.83 च्या सरासरीने 946 धावा केल्या आहेत. त्यामुळे जर गिलने कोलकात्यातील पहिल्या कसोटीत फक्त 54 धावा केल्या, तर तो सुनील गावस्करांचा (Sunil Gavaskar) विक्रम मोडेल. गावस्करांनी 15 कसोटी डावांमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या होत्या.

याशिवाय शुबमन गिल विराट कोहलीचा (Shubhman gill got the chance to brake virat kohli record) आणखी एक विक्रम मोडू शकतो. गिल एका कॅलेंडर वर्षात भारतीय कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक शतक झळकावणारा खेळाडू बनू शकतो. सध्या तो विराट कोहलीच्या बरोबरीवर आहे. कोहलीने कसोटीत कर्णधार म्हणून 2017 आणि 2018 या दोन्ही वर्षांत 5-5 शतकं झळकावली होती. जर गिलने कोलकाता कसोटीत आणखी एक शतक झळकावले, तर तो कोहलीचाही विक्रम मागे टाकेल.

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतक झळकावणारे भारतीय कर्णधार

विराट कोहली – 5 शतकं (2017)

विराट कोहली – 5 शतकं (2018)

शुबमन गिल – 5 शतकं (2025)

विराट कोहली – 4 शतकं (2016)

सचिन तेंडुलकर – 4 शतकं (1997)

Comments are closed.