बाबर आझमने निवडली टी20साठी बेस्ट प्लेइंग इलेव्हन, विराट-बुमराह बाहेर, फक्त 2 पाकिस्तानी खेळाडूंची एन्ट्री!

पाकिस्तानचा सुपरस्टार फलंदाज बाबर आझम सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. दरम्यान, बाबरचा एक जुना व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात तो जगातील सर्वोत्तम टी20 प्लेइंग इलेव्हन निवडताना दिसत आहे. बाबरने आपल्या या टीममध्ये भारतीय दिग्गज विराट कोहलीला स्थान दिलेले नाही. त्याशिवाय जसप्रीत बुमराहलाही त्याने दुर्लक्षित केले आहे. मात्र, त्याने आपल्या संघात दोन पाकिस्तानी खेळाडूंना स्थान दिले आहे.

एका मुलाखतीदरम्यान बाबर आझमने जगातील सर्वोत्तम टी20 प्लेइंग इलेव्हनची निवड केली. ज्यात सलामी फलंदाज म्हणून त्याने रोहित शर्माची निवड केली आहे. त्याच्यासोबत जोडीदार म्हणून बाबरने पाकिस्तानी यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिजवानला संधी दिली आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याने फखर झमानची निवड केली, तर चौथ्या क्रमांकावर भारतीय टी20 संघाचा सध्याचा कर्णधार सूर्यकुमार यादवला स्थान दिले आहे. पाचव्या क्रमांकावर इंग्लंडचा फलंदाज जोस बटलर दिसून येतो.

फिनिशरच्या भूमिकेसाठी बाबरने डेव्हिड मिलरची निवड केली आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाजी ऑलराउंडर मार्को यान्सनलाही या संघात स्थान मिळाले आहे. फिरकी गोलंदाजीची जबाबदारी बाबरने अफगाणिस्तानचा स्टार खेळाडू राशिद खानकडे सोपवली आहे. तर वेगवान गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचे सुपरस्टार मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स दिसून येतात. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडलाही बाबरने आपल्या संघात निवडले आहे. बाबरच्या टीममध्ये फक्त एकच फिरकी गोलंदाज आहे.

प्लेइंग इलेव्हन:
रोहित शर्मा, मोहम्मद रिजवान, फखर झमान, सूर्यकुमार यादव, जोस बटलर, डेव्हिड मिलर, मार्को यान्सन, राशिद खान, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि मार्क वुड.

Comments are closed.