हाशिम अमलाने कोहली नव्हे, तर या खेळाडूला म्हटलं कसोटी क्रिकेटचा सर्वश्रेष्ठ फलंदाज! चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण

भारतविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी हाशिम अमलाचं (Hashim Amla) वक्तव्य सध्या जोरदार व्हायरल होत आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज हाशिम अमलाने कसोटी क्रिकेटमधील टॉप तीन सर्वोत्तम फलंदाजांची निवड केली आहे. मात्र आश्चर्य म्हणजे, या यादीत एका भारतीय खेळाडूलाही स्थान दिलेलं नाही.

अमलाने पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा स्टीव स्मिथ, दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा जो रूट, आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा केन विल्यमसनची निवड केली आहे.

स्मिथबद्दल बोलताना अमला म्हणाला,प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव स्मिथची फलंदाजी खूप आवडते. माझ्या मते स्मिथ हा जगातील सर्वोत्तम कसोटी खेळाडू आहे. त्यानंतर मी दुसऱ्या क्रमांकावर जो रूटला (Jo Root) ठेवीन, तोही एक महान कसोटी बॅट्समन आहे. आणि तिसऱ्या क्रमांकावर मी केन विल्यमसनला निवडीन.

स्टीव स्मिथच्या (Steve Smith) कसोटी कारकिर्दीकडे पाहिलं तर त्याने आत्तापर्यंत 119 सामने खेळून 10,477 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 36 शतकं आणि 43 अर्धशतकं नोंद आहेत.

जो रूटने 158 कसोटी सामन्यांत एकूण 13,543 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 39 शतकं आणि 66 अर्धशतकं आहेत. केन विल्यमसनने (Kane Williamson) 105 कसोटी सामन्यांत 9,276 धावा केल्या असून त्याने 33 शतकं आणि 37 अर्धशतकं झळकावली आहेत.

हाशिम अमलाने या तिघांची निवड करताना विराट कोहलीला स्थान न देऊन सर्वांना थोडं आश्चर्यचकित केलं आहे. विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 123 सामने खेळून एकूण 9,230 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर 30 शतकं आणि 31 अर्धशतकं आहेत.

Comments are closed.