शरद पवार, अदानी सोफ्यावर, मुख्यमंत्री खुर्चीवर; शाही लग्नात दिग्गज एकत्र, व्हायरल फोटो कुठला?


मुंबई : दोन दिवसांपूर्वी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांची निवड झाली, तेव्हा नवनिर्वाचित अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (देवेंद्र फडणवीस) यांचे आभार मानले. कारण, या दोन्ही नेत्यांनी एमसीए निवडणुकीत त्यांना मदत केली होती. विशेष म्हणजे याच निवडणुकीसंदर्भाने भाष्य करताना शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे कौतुकही केले होते. आता, साताऱ्यातील (Satara) एका लग्नसोहळ्यात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्यासमवेत उद्योगपती गौतम अदानी हेही या लग्नसोहळ्याला हजर होते. सामाजिक मीडियावर या तीन दिग्गजांचे फोटो व्हायरल होत आहेत. तर, स्वत: शरद पवारांनीही सामाजिक मीडियातून माहिती दिली.

आयपीएस अधिकारी प्रवीण रामराव पवार यांची कन्या प्राजक्ताहिमांशू यांच्या लग्न समारंभास उपस्थित राहिलो; नवदंपत्यास शुभेच्छा दिले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पक्षाचे प्रदेशाध्यक्षआमदार शशिकांत शिंदे हेदेखील उपस्थित होते, अशी माहिती शरद पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टवरुन दिली आहे. या फोटोमध्ये एका सोफ्यावर शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी बसलेले आहेत. तर, बाजुलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हेही बसल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे शरद पवारांनी शेअर केलेल्या या फोटोवर नेटिझन्स टिप्पणी द्या करुन मजा घेत आहेत. तुमच्या पोस्टमध्ये गौतम अदानींचा का उल्लेख केला नाही? असा प्रश्न टिप्पणी द्या करुन विचारला जात आहे.

हेही वाचा

मराठी: फुकटचा ताठा अन् नाव उबाठा, एकनाथ शिंदेंची बोचरी टीका; म्हणाले, एक बिस्किटचा पुडाही दिला नाही

आणखी वाचा

Comments are closed.