मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरला रिलीज करणार? IPL 2026 ऑक्शनपूर्वी LSGमध्ये अदला-बदली निश्चित
क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला मुंबई इंडियन्सने मागील सत्रातील मेगा ऑक्शनमध्ये त्याला बेस प्राइसवर खरेदी केले होते. मात्र, 2025 च्या हंगामात अर्जुनला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता आयपीएल 2026 (Indian premiere league 2026) पूर्वी डिसेंबर महिन्यात मिनी ऑक्शन होणार आहे. 15 नोव्हेंबरला रिटेन्शन लिस्ट जाहीर केली जाणार असून कोणत्या फ्रँचायझीने कोणत्या खेळाडूला ठेवले (retain) आणि कोणाला सोडले (release) हे स्पष्ट होईल. या दरम्यान मोठी बातमी समोर आली आहे की, मुंबई इंडियन्स अर्जुन तेंडुलकरचा निरोप घेऊ शकते.
रिपोर्टनुसार, अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) यांच्याबाबत मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lakhnau Super giant’s) यांच्यात चर्चा सुरू आहे. रिपोर्टनुसार, दोघांची अदला-बदली होऊ शकते, तसेच ही डील पूर्णपणे कॅश ट्रान्सफरच्या स्वरूपातही होण्याची शक्यता आहे.
IPL ट्रेड नियमांनुसार, कोणत्याही ट्रान्सफरची अधिकृत घोषणा केवळ बीसीसीआय (BCCI) करू शकते.
त्यामुळे दोन्ही फ्रँचायझी सध्या याबाबत काही बोलत नाहीत. मुंबई क्रिकेटशी संबंधित एका सूत्राने क्रिकबजला सांगितले की, मुंबई आणि लखनौ यांच्यातील हा ट्रेड होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याची घोषणा काही दिवसांत केली जाऊ शकते.
शार्दुल ठाकूरबद्दल (Shardul Thakur) बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये तो अनसोल्ड राहिला होता. यानंतर लखनौ सुपर जायंट्सने त्याला 2 कोटी रुपयांत रिप्लेसमेंट प्लेअर म्हणून संघात घेतले होते. 2025 च्या हंगामात शार्दुलने एकूण 10 सामने खेळले आणि 13 विकेट्स घेतल्या. तो चांगला फलंदाजही आहे, पण मागील हंगामात त्याने फलंदाजीने विशेष कामगिरी केली नाही.
अर्जुन तेंडुलकरबाबत सांगायचे झाले तर, मागील हंगामात त्याला एकही सामना खेळता आला नाही.
तो 2023 पासून मुंबई इंडियन्ससोबत आहे, पण अद्याप मोठा प्रभाव पाडू शकलेला नाही. 2023 मध्ये अर्जुनने 4 सामने खेळले आणि 3 विकेट्स घेतल्या. 2024 मध्ये त्याला फक्त एकच सामना खेळण्याची संधी मिळाली आणि त्यातही त्याला विकेट मिळाली नाही.
Comments are closed.