आयपीएल 2026 आधी 10 विजेत्या खेळाडूंना संघ रिलीज करण्याची शक्यता, होणार मोठी उलथापालथ!
आयपीएल 2026 (IPL 2026) पूर्वी सर्व फ्रँचायझी तयारीला लागल्या आहेत. येणाऱ्या हंगामात मोठं उलटफेर घडण्याची शक्यता आहे. या वेळी अनेक स्टार खेळाडू नवीन संघासाठी खेळताना दिसू शकतात. आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी तब्बल 10 स्टार खेळाडूंना त्यांच्या फ्रँचायझी टीममधून बाहेर काढलं जाऊ शकतं.
राजस्थान रॉयल्सच्या (Rajasthan royals) बाबतीत बोलायचं झालं तर, संघ संजू सॅमसन (Sanju Samson) सोडून शिमरोन हेटमायरला रिलीज करू शकतो. त्याचप्रमाणे लखनौ सुपर जायंट्स (LSG) संघ मयंक यादवला बाहेर काढू शकतो.
मुंबई इंडियन्सदेखील अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्टला (Trent Boult) रिलीज करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, डिफेंडिंग चॅम्पियन आरसीबी (RCB) संघ लियाम लिव्हिंगस्टोन आणि यश दयाल या दोघांना टीममधून बाहेर करू शकते.
गुजरात टायटन्स, जी 2022 पासून आयपीएलचा भाग आहे, तीही शाहरुख खानला टीमबाहेर करण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे, केकेआर (Kolkata Knight Riders) संघ अजिंक्य रहाणे आणि वेंकटेश अय्यरला साइडलाइन करू शकतो. तसेच, 5 वेळची विजेती चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघ राहुल त्रिपाठीला रिलीज करण्याची शक्यता आहे.
Comments are closed.