ट्रकला धडकल्यानंतर बस खोल दरीत कोसळली, 37 प्रवाशांचा मृत्यू; 13 जण जखमी

भरधाव बस ट्रकला धडकल्यानंतर थेट दरीत कोसळली. या अपघातात बसमधील 37 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 13 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
दक्षिण पेरूमध्ये बुधवारी पहाटे ही अपघाताची घटना घडली. एक प्रवासी बस ट्रकला धडकल्यानंतर खोल दरीत ओकोना नदीच्या काठावर पडली. बस चालापासून अरेक्विपा शहराकडे जात होती. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघाताचा सखोल तपास सुरू आहे.

Comments are closed.