हसीना समर्थकांचे ‘ढाका लॉकडाऊन’, बांगलादेशात बॉम्बस्फोट… जाळपोळ

माजी पंतप्रधान शेख सुंदर स्त्री यांच्या विरोधातील खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशात आज पुन्हा हिंसाचार उसळला. सुंदर स्त्री समर्थकांनी 'ढाका लॉकडाऊन'ची हाक दिल्याने ठिणगी पडली आणि ठिकठिकाणी जाळपोळ झाली. पाच ठिकाणी स्फोट घडवून आणण्यात आले. हिंसाचाराचे हे लोण इतर शहरांतही पसरल्याने प्रचंड तणाव आहे.

मागील वर्षी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात बांगलादेशात विद्यार्थी आंदोलन पेटले. ते शमवण्यासाठी सरकारने केलेल्या कारवाईत 500हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. आंदोलन अधिकच पेटल्याने हसीना यांना सत्ता आणि देश सोडावा लागला. त्याच प्रकरणात आता हसीना यांच्यासह विविध मंत्र्यांवर खटला सुरू आहे. आज या निकालाची तारीख ठरणार होती.

हा हसीना यांना अडकवण्याचा आणि पुन्हा बांगलादेशात येऊ न देण्याचा कट आहे, असा आरोप त्यांचा पक्ष अवामी लीगने केला आहे. या खटल्याच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. आज ते अधिकच उग्र झाले. त्यामुळे ढाका शहरातील दैनंदिन जनजीवन ठप्प झाले. अनेक ठिकाणी जाळपोळ झाली. काही ठिकाणी क्रूड बॉम्बने हल्ले करण्यात आले.

हसीनाप्रकरणी 17 नोव्हेंबरला निकाल

शेख हसीना यांच्या विरोधातील खटल्याचा निकाल 17 नोव्हेंबरला दिला जाईल, असे बांगलादेशातील आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने आज स्पष्ट केले. त्यांच्यावर मानवतेविरुद्ध गुह्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. हसीना व गृहमंत्री असदुझमान कमाल यांना याआधीच फरार घोषित करण्यात आले आहे. त्यांना मृत्युदंड देण्याची मागणी सरकारी पक्षाने न्यायालयाकडे केली आहे.

निवडणूक फेब्रुवारीत; अवामी लीगवर बंदी

बांगलादेशातील हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी आज सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार पुढील वर्षी 2026 मध्ये तिथे सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. त्याचबरोबर राज्यघटनेतील दुरुस्तीसाठी सार्वमतही घेतले जाणार आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षावर मात्र निवडणूक बंदी लादण्यात आली आहे.

Comments are closed.