बिहार निवडणुकीचा आज निकाल; नितीश कुमार की तेजस्वी यादव, कोण होणार बिहारचा बाहुबली?, 243 जागांसा


बिहार निवडणूक निकाल 2025: बिहारमध्ये (Bihar Election 2025) नीतिशकुमार (Nitish Kumar) की तेजस्वी यादव? (Tejashwi Yadav) कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे. बिहारमधील 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगत आहे.

बिहारच्या निवडणुकीत (Bihar Election Result 2025) झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगलीच चर्चा झाली. नितीशकुमारांचं चॅनल दिल्लीतून रिमोटसारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शाह (Amit Shah) यांनी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला पाहायला मिळाला. जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटण दाबा असा गंभीर आरोप अमित शाहांनी केलेला पाहयाल मिळाला. त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल.

मतदान केंद्रांवर मतमोजणीसाठी कडक सुरक्षा- (Bihar Election Result 2025)

बिहारमधील 243 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे. आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील. त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाणार आहे. 38 जिल्ह्यांमधील 46 मतदान केंद्रांवर मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.. दरम्यान 243 निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्यासोबत तैनात असलेल्या 243 निरीक्षकांच्या उपस्थितीत आणि उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीत मतमोजणी केली जाणार आहे.

बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान- (Bihar Total Voting)

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यातील 121 मतदारसंघात 65.08 टक्के मतदान पार पडलं आहे. गेल्यावेळी पहिल्या टप्प्यात 57.29 टक्के मतदान झालं. तर, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यात 20 जिल्ह्यातील 122 जागांवर 68.76 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एकूण 66.91 टक्के मतदान झालं आहे. एनडीएला 2020 मध्ये 132 जागा मिळाल्या होत्या. तर, महागठबंधन बहुमतापासून दूर राहिलं होतं. राजदला 75 जागा, काँग्रेसला 19 आणि सीपीआये माले पक्षाला 12 जागांवर विजय मिळालेला.

नितीश कुमार यांचा जेडीयू ठरणार सर्वात मोठा पक्ष? (Nitish Kumar JDU Result)

बिहार विधानसभा निवडणुकीतील 243 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाल्यानंतर, एक्झिट पोलचे निकाल आता समोर आले आहेत. मॅट्रिज आयएएनएसच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात एनडीए पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या तयारीत आहे. एनडीएला 147 ते 167 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. महाआघाडीला 70 ते 100 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पोलनुसार, नितीश कुमार यांचा जेडीयू एनडीएमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे, तर आरजेडी महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे.

एनडीए: 147-167  जागा (Bihar Election 2025 Exit Poll)

भाजप: 65 ते 73 जागा
जेडीयू: 67 ते 75  जागा
एलजेपी(आर): 7 ते 9 जागा
एचएएम: 4 ते 5 जागा
आरएलएम: 1 ते 2 जागा

महागठबंधन किती जागा जिंकणार? (Mahagathbandan Result In Bihar Election 2025)

दरम्यान, मॅट्रिज आयएएनएसच्या एक्झिट पोलनुसार, महाआघाडीला 70 ते 90 जागा मिळण्याची अपेक्षा आहे. या एक्झिट पोलनुसार, महाआघाडीत राजद सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला आहे. काँग्रेसची संख्या 10 ते 12 जागांपर्यंत मर्यादित आहे.

महाआघाडी – 70 ते 90 जागा
राजद – 53 ते 58  जागा
काँग्रेस – 10 ते 12 जागा
व्हीआयपी – 1 ते 4 जागा
डावे पक्ष -9 ते 14  जागा

2020  विधानसभा निवडणुकीचे निकाल (Bihar Election Result 2020)

मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने 74 जागा, जेडीयूने 43 आरजेडीने 75 , एलजेपीने 1, एआयएमआयएमने 5, काँग्रेसने 19, सीपीएमने 2, सीपीआयने 2 आणि बसपाने 1 जागा जिंकल्या होत्या.

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई आकडा किती? (Bihar Election Result 2025)

बिहारमध्ये बहुमतासाठी जादूई संख्या 122 आहे. राज्यात एकूण 243 विधानसभा जागा आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवारी (११ नोव्हेंबर) संपले. 20 जिल्ह्यांमधील 122 जागांवर मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 68.42 टक्के मतदान झाले. राज्यातील पहिल्या टप्प्यातील मतदान 6  नोव्हेंबर रोजी झाले, ज्यामध्ये 18 जिल्ह्यांमधील 121 जागांचा समावेश होता. पहिल्या टप्प्यात सरासरी 65.08 टक्के मतदान झाले.

एक्झिट पोलनुसार भाजप प्रणित एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता- (Narendra Modi vs Rahul Gandhi)

एक्झिट पोलनुसार, भाजप प्रणित एनडीएला दीडशेहून जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला 145 ते 163 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर महागठबंधनला 76 ते 95 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Bihar Election Result 2025 Live Updates: बिहारमध्ये कुणाचं सरकार, एनडीए की महागठबंधन, विधानसभा निवडणूक निकालाचे वेगवान लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

आणखी वाचा

Comments are closed.