सोलापूर भाजपमध्ये मोठी घडामोड, सुभाष देशमुखांच्या विरोधानंतर दिलीप मानेंना अजित पवार गटाची ऑफर


सोलापूर राजकारण बातम्या : भाजपमधील रखडलेल्या पक्ष प्रवेशानंतर सोलापुरातील माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) याना राष्ट्रवादी अजित पवार(Ajit Pawar NCP) गटाकडून ऑफर देण्यात आलीय. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका तोंडावर असताना भाजपमध्ये (BJP) जोरदार इन्कमिंग सुरूय. सोलापुरात देखील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपत प्रवेश केलाय. मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांचा प्रवेश मात्र अद्याप झालेला नाही. स्थानिक भाजप आमदार, माजी सहकार मंत्री यांच्या विरोधामुळे हा प्रवेश रखडल्याचे बोलले जातय, त्यातच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष पवार यांनी दिलीप माने यांची भेट घेत त्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याची माहिती आहे. तसेच आगामी महापालिका निवडणूक दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली लढण्याची तयारी असल्याचे देखील राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याची माहिती आहे.

Dilip Mane : तर प्रवेश होईल, अन्यथा इतर मार्ग खुले आहेत

दरम्यानयावर दिलीप माने यांनी अद्याप या प्रस्तावावर कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. माने यांच्या रखडलेल्या प्रवेशावर आता सुभाष देशमुख (Subhash Deshmukh)यांनी देखील आपली बाजू स्पष्ट केलीय. माझा कोणाच्या ही प्रवेशाला विरोध नाहीये. मात्र पक्षात येणाऱ्या लोकांनी किमान तीन वर्ष संघटनेसाठी काम करावे, त्यानंतरच त्यांना तिकीट देण्यात यावेत. पक्षासाठी त्याग करणाऱ्यांना संधी मिळावी, अशी भूमिका असल्याचे सुभाष देशमुख यांनी म्हटलंय. दरम्यान आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रवेशाबद्दल निर्णय कळवणार असल्याचे सांगितलं होते. भाजप नेतृत्वाला जर मी पक्षात यावं असं वाटतं असेल तर प्रवेश होईल, अन्यथा इतर मार्ग खुले आहेत. असे मतं दिलीप माने यांनी व्यक्त केलंय.

Dilip Mane : मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात ते बघू

तसेच सुभाष देशमुखवर खोचक टीका देखील माने यांनी केलीय. पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार सुभाष देशमुख याना दिले असतील तर मला माहिती नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात बघू, अशी प्रतिक्रिया दिलीप माने यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादीकडून ऑफर आल्याचे देखील त्यांनी मान्य केलं. मात्र या संदर्भात आपण कोणतीही प्रतिक्रिया कळवली नसल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपने स्वबळावर लढण्याचे जवळपास निश्चित केले आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष यंदा भाजपचाच असेल, अशी भाषा वारंवार सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून स्थानिक पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेतले जात आहे. जिल्हा पातळीवर युतीबाबतचा अंतिम निर्णय सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे घेणार असल्याचेही कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले होते.

आणखी वाचा

काल रात्री फडणवीसांची भेट घेतली अन् आज सोलापूरच्या माजी आमदारांची भाषाच बदलली, म्हणाले, ‘हर्षवर्धन सपकाळांना मी कोण हे माहिती तरी आहे का?’

आणखी वाचा

Comments are closed.