Maharashtra LIVE Superfast News : 6 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 14 Novmber 2025 : ABP Majha
Maharashtra LIVE Superfast News : 6 AM : सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 14 Novmber 2025 : ABP Majha
बिहारमध्ये नीतिशकुमार की तेजस्वी यादव ? कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री याचं उत्तर आज मिळणार आहे…बिहारमधील २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत NDA आणि महागठबंधन यांच्यात थेट टक्कर आहे, तर प्रशांत किशोरांच्या जन सुराज पक्षामुळे त्रिकोणी लढत रंगतीय…बिहारच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपांची देशभरात चांगलीच चर्चा झाली…नितीशकुमारांचं चॅनल दिल्लीतून रिमोटसारखं बदललं जातं असा आरोप राहुल गांधींनी केला…तर महागठबंधनला रोखण्यासाठी अमित शाहांनी आपल्या प्रचार सभेत जोरदार हल्ला चढवलेला पाहायला मिळाला…जंगलराज रोखण्यासाठी कमळाचं बटण दाबा असा गंभीर आरोप अमित शाहांनी केलेला पाहयाल मिळाला…त्यामुळे जनता कुणाच्या आरोपांना खरं मानणार आणि कुणाला खोटं ठरवणार याचं उत्तर आज मिळेल….
बिहारमधील २४३ विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी होणार आहे.. आधी पोस्टल मतपत्रिका मोजल्या जातील.. त्यानंतर ईव्हीएम मतांची मोजणी केली जाणार आहे.. ३८ जिल्ह्यांमधील ४६ मतदान केंद्रांवर मतमोजणीसाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.. दरम्यान २४३ निवडणूक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली, त्यांच्यासोबत तैनात असलेल्या २४३ निरीक्षकांच्या उपस्थितीत आणि उमेदवार किंवा त्यांच्या एजंटच्या उपस्थितीत मतमोजणी केली जाणार आहे..
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीपूर्वी तेजस्वी यादव यांनी त्यांच्या अधिकृत निवासस्थानी महाआघाडीच्या नेत्यांची बैठक घेतली. काल झालेल्या बैठकीनंतर तेजस्वी यादव यांनी पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करण्याचा दावा केला. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगाला मतमोजणी नि:पक्षपातीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं. चुरशीच्या असलेल्या काही जागांवर मतमोजणी संथ करण्याचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
Comments are closed.