ईडीने बघेल यांच्या मुलाची ६१ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे
रायपूर : छत्तीसगडमधील मद्य घोटाळ्यासंबंधी सुरू असलेल्या चौकशीचा भाग म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोठी कारवाई केली आहे. माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांच्याशी संबंधित 61.20 कोटी रुपयांची मालमत्ता गुरुवारी जप्त करण्यात आली. ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार करण्यात आली. जप्त केलेल्या मालमत्तेत 364 निवासी भूखंड आणि 59.96 कोटी किमतीच्या शेत जमिनीच्या स्वरुपातील स्थावर मालमत्ता समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त बँक बॅलन्स आणि मुदत ठेवींच्या स्वरूपात 1.24 कोटी किमतीची जंगम मालमत्ताही आढळली आहे. छत्तीसगडमधील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणांच्या चौकशीदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
Comments are closed.