4 फिरकीपटू, 2 गोलंदाज; कर्णधार शुभमन गिलचा मोठा निर्णय, टीम इंडियात दोन मोठे बदल, जाणून घ्या Pl
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिली कसोटी नाणेफेक अपडेट : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक आफ्रिकन कर्णधार टेम्बा बावुमाने जिंकले. टेम्बा बावुमाने टॉस जिंकत पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार भारतीय संघाला पहिल्यांदा गोलंदाजीसाठी मैदानात उतरावे लागणार आहे.
🚨 नाणेफेक 🚨#TeamIndia कोलकातामध्ये प्रथम गोलंदाजी करण्यास सांगितले आहे.
अपडेट्स ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/St1ygiQWwt
— BCCI (@BCCI) 14 नोव्हेंबर 2025
पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकाने जिंकली नाणेफेक!
कोलकाता कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नाणेफेकीच्या वेळी बावुमाने प्लेइंग इलेव्हन जाहीर केली. कागिसो रबाडाला वगळण्यात आले आणि त्याच्या जागी कॉर्बिन बॉशला संधी देण्यात आली. दरम्यान, कर्णधार शुभमन गिलने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल जाहीर केले. ऋषभ पंत नितीशकुमार रेड्डीऐवजी परतला आणि अक्षरही परतला.
भारतीय संघाची प्लेइंग-11
यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, वॉशिंग्टन सुंदर, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
वर एक नजर #TeamIndiaप्लेइंग इलेव्हन 🙌
अपडेट्स ▶️ https://t.co/okTBo3qxVH#INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/i7UcpmmkF7
— BCCI (@BCCI) 14 नोव्हेंबर 2025
दक्षिण आफ्रिका संघाची प्लेइंग इलेव्हन
एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, वियान मुल्डर, टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी जोर्झी, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज.
भारत आणि दक्षिण आफ्रिका : टेस्ट सामना रेकॉर्ड
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील हा एकूण 45वा टेस्ट सामना आहे. यापूर्वी झालेल्या 44 पैकी 16 सामने भारताने जिंकले आहेत, तर 18 सामने दक्षिण आफ्रिकेने जिंकले. दोन्ही संघांमधील 10 सामने अनिर्णित राहिले आहेत. भारतीय भूमीवर हा दोन्ही संघांमधील 20वा कसोटी सामना असेल. याआधी झालेल्या 19 सामन्यांमध्ये भारताने 11 विजय मिळवले, तर दक्षिण आफ्रिकेने 5 सामने जिंकले. 3 सामने ड्रॉ झाले आहेत.
ईडन गार्डन्सवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
ईडन गार्डन्सवर दोन्ही संघ 15 वर्षांनंतर कसोटी सामना खेळणार आहेत. येथे दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना 1996 मध्ये झाला होता. त्यानंतर 2010 पर्यंत या मैदानावर 3 टेस्ट सामने झाले, ज्यात भारताने 2-1 अशी आघाडी घेतली होती.
दक्षिण आफ्रिकेला भारतात 2000 नंतर एकही टेस्ट मालिका जिंकता आलेली नाही. म्हणजेच भारतातील मालिकेतील विजयासाठी त्यांची प्रतीक्षा मागील 25 वर्षांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या मालिकेत भारताचा बाजूने पलडा थोडा जड मानला जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.