नवले ब्रीज अपघातातील बॉडींची अवस्था पाहून रुग्णवाहिका चालकही हळहळला; म्हणाला, बरेच अपघात पाहिले
पुणे : नवले ब्रीज परिसरातील मुंबई–बेंगळुरू महामार्गावर गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात (Pune Navale Bridge fatal Accident) झाला. नवीन कात्रज बोगद्यापुढील दरी पूल ते नवले पूल या उतारावर वेगाने उतरणाऱ्या मालवाहू ट्रकने नियंत्रण सुटल्याने आठ ते दहा वाहनांना धडक दिली. त्यानंतर ट्रकने एका कारला जबर धडक देत ती फरफटत पुढे नेली आणि पुढील ट्रकवर आदळली. दोन्ही ट्रकांच्या मध्ये अडकलेली कार पूर्णपणे चिरडली (Pune Navale Bridge fatal Accident)जाऊन पेटली. काही क्षणांतच स्फोट होऊन कार जळून खाक झाली. या भीषण दुर्घटनेत कारमधील सर्व प्रवाशांसह एकूण आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला, एक लहान बाळ आणि चार पुरुषांचा समावेश आहे.(Pune Navale Bridge fatal Accident)
सायंकाळी सुमारे ५.४० वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने फोन करून नवले पुलाजवळ दोन ते तीन वाहनांचा अपघात झाल्याची आणि त्यांना आग लागल्याची माहिती दिली. तत्काळ सिंहगड (Pune Navale Bridge fatal Accident)रोड अग्निशमन केंद्राची गाडी घटनास्थळी रवाना करण्यात आली. तेथे पोहोचल्यावर एका कारमध्ये व्यक्ती अडकली असल्याचे दिसून येताच परिस्थिती अधिक गंभीर बनली आणि सर्व यंत्रणा तातडीने कामाला लागल्या.(Pune Navale Bridge fatal Accident)
नियंत्रण कक्षातून पाठवलेली सिंहगड रोड केंद्राची पहिली गाडी अंदाजे ५.४८ वाजता घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर केवळ एका मिनिटात नवले केंद्र आणि पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या दोन गाड्याही दाखल झाल्या. जवानांनी प्रथम पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.
आग नियंत्रणात आल्यानंतर ट्रकखाली कार चिरडून दबल्याचे स्पष्ट झाले. तात्काळ क्रेन मागवून अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली. कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाल्याने रेस्क्यू व्हॅनमधील कटर, स्प्रेडर आणि इतर उपकरणांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कारमधून दोन पुरुष, दोन महिला आणि एका लहान मुलाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर ट्रकमधून दोघांचे मृतदेह सापडले. या बचाव मोहिमेत अग्निशमन दल प्रमुख देवेंद्र पोटफोडे, अधिकारी प्रभाकर उमरटकर, संतोष भिलारे आणि जवळपास ४० जवान सहभागी झाले. तसेच पीएमआरडीएच्या दोन गाड्या आणि एक रेस्क्यू व्हॅनची मदत मिळाली.(Pune Navale Bridge fatal Accident)
रुग्णवाहिका चालक असलेले सचिन मोरे या अपघाताबाबत बोलताना म्हणाले, विविध अपघातांत मृत्यू झालेल्यांची वाहतूक यापूर्वी केली आहे. मात्र, या अपघातात मृतांची अवस्था पाहून खूप दुःख झाले. अशी घटना पुन्हा होऊ नये, हीच प्रार्थना.
आणखी वाचा
Comments are closed.