माझ्या मुलाने ते फोटो पाहिले तर… गिरीजा ओक स्पष्टच बोलली

मराठीमधली प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक ही गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहे. गिरीजाचे साडीतले फोटो देशभरात व्हायरल होत असून तिला न्यू नॅशनल क्रश म्हटले जात आहे. एकीकडे तिच्या कामाचे, लूक्सचे कौतुक होत असतानाच काही समाजकंटाकांनी तिचे मॉर्फ केलेले फोटो देखील समाजमाध्यमांवर व्हायरल केले आहे. त्यावर गिरीजाने एक व्हिडीओ शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

”सोशल मीडियावर जे काही सुरू आहे ते भांबावून सोडणारं आहे. अर्थात याचा मला खूप आनंद होतोय…गेल्या काही दिवसात खूप मेसेज आलेत. सर्वांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. याबद्दल मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. माझ्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी अनेक फोटो, मीम्स मला पाठवलेत. त्यातल्या काही पोस्ट खूपच क्रिएटिव्ह आहेत. पण, याचबरोबर काही पोस्ट या अश्लील आहेत. AI चा वापर करून हे फोटो एडिट करण्यात आले आहेत. यावरुन एक गोष्ट सांगेन, मी सुद्धा याच काळातील मुलगी आहे…सोशल मीडिया, समाजमाध्यम वापरणारी मुलगी आहे. मला माहितीये जेव्हा एखादी गोष्ट ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते…तेव्हा अशाप्रकारच्या पोस्ट तयार केल्या जातात. AI वापरून हे फोटो विकृत केले जातात किंवा बदलले जातात. ज्यामुळे लाइक्सचा खेळ सुरू होतो आणि या खेळाला कोणतेही नियम नाहीयेत. याची मला भीती वाटते. मला एक १२ वर्षांचा मुलगा आहे. आता तो सोशल मीडियाचा वापर करत नाहीये. पण, तो मोठा झाल्यावर सोशल मीडिया वापरेल. हे जे मॉर्फ केलेले फोटो आहेत…ते इंटरनेटवर सदैव राहतील. माझ्या मुलाने भविष्यात माझा तसा कोणता मॉर्फ केलेला फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल? याचा विचार करूनच दडपण येतं. खरंतर, त्याला माहिती असेल हा फोटो खरा नाहीये किंवा हा AI वापरून बनवलेला फोटो आहे. आताही लोकांना असे मॉर्फ फोटो सहज ओळखता येतात.” त्यामुळे असे चुकीचे फोटो लाइक्सच्या खेळात व्हायरल करू नका अशी विनंती गिरिजाने चाहत्यांना केली आहे. ती पुढे काय म्हणालीये पाहुयात…

Comments are closed.