दानवे म्हणाले, काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली तीच बिहारमध्ये, भाई जगताप संतापून म्हणाले, त
बिहार निवडणूक निकाल 2025: बिहार विधानसभा निवडणुकीचा (Bihar Election Result 2025) आज निकाल आहे. आतापर्यंत (दुपारी 2) 243 पैकी 243 जागेचा कल हाती लागला आहे. यामध्ये एनडीए 202 जागांवर, महागठबंधन 35 जागांवर आणि इतर 6 जागांवर आघाडीवर आहे. आताच्या कलानूसार बिहारमध्ये एनडीएला घवघवीत यश मिळाल्याचं दिसत आहे. याचदरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना काँग्रेसने जी चूक महाराष्ट्रात केली, तिच चूक बिहारमध्ये केल्याचं स्पष्ट केलं.
बिहार (Bihar Election Result 2025) निवडणुकीत पराभव झाला हे मान्य आहे. भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय, तेजस्वी यादव (Tejashvi Yadav) यांचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करायला वेळ लावला. त्यामुळं खूप उशीर झाला. काँग्रेस आणि आरजेडीने चुका केल्या, असं अंबादास दानवे म्हणाले. मतदार यादी घोळ कायम आहेच.काँग्रेस जागावाटप मध्ये मोठा वाटा मागते. विजयाचे गणित आले की मोठा पराभव होतो, माझं हे मत स्पष्ट आहे, असं अंबादान दानवेंनी सांगितले. अंबादास दानवेंच्या विधानावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनीही शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकवल्याचं म्हटलं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्याआधीच शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचं फाटल्याचं दिसून येतंय.
काँग्रेसने आता वृत्ती बदलावी- अंबादास दानवे (Ambadas Danve On Bihar Election Result 2025)
बिहारचे गणित महाराष्ट्राचे गणित वेगळे आहे. राज्यात महाविकास आघाडी व्हावी आमची इच्छा आहे. मात्र जागावाटप अखेरच्या दिवशी पर्यंत होत असेल तर गंभीर आहे, याचे परिणाम निकालावर होतो, असं स्पष्ट मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री चेहरा घोषीत केले असते. जागावाटप आधी केले असते ,तर महाराष्ट्रात चित्र वेगळे असते, जी चूक महाराष्ट्रमध्ये झाली, तीच बिहारमध्ये झाली, काँग्रेसने आता ही वृत्ती बदलावी, असा सल्लाही अंबादास दानवेंनी दिला.
अंबादास दानवेंच्या विधानावर काँग्रेसचे भाई जगताप काय म्हणाले? (Bhai Jagtap On Bihar Election Result 2025)
अंबादास दानवे खूप विद्वान आहेत. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते राहिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा, लोकसभा हे वेगवेगळे विषय आहेत. मी काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष असताना त्यावेळी मुंबईपुरतं मत मांडलेलं की काँग्रेसने स्वबळावर लढले पाहिजे आणि आजही माझं तेच मत आहे. आमच्या नेत्यांचं काय मत आहे, ते आम्ही मान्य करु, असं भाई जगताप यांनी सांगितले. तसेच भायखळामध्ये शिवसेना कधीच जिंकली नव्हती. वांद्रे पूर्वमध्ये एकदाच फक्त शिवसेना जिंकली. शिवसेनेने काँग्रेसच्या सगळ्या जागा बळकवल्या, हे माझं स्पष्ट मत आहे, असं भाई जगताप एबीपी माझाशी बोलताना म्हणाले. स्थानिक कार्यकर्त्यांचा काय कल असतो, त्यानूसार चर्चा झाल्या पाहिजे आणि आपल्या चर्चा शेवटपर्यंत होत असतात आणि मग विळ उरत नाही, हे मान्य आहे, असंही भाई जगताप यांनी सांगितले.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.