IND vs SA: यशस्वी जयस्वालच्या फक्त 12 धावांनी मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम! क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ निर्माण
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जात आहे या सामन्यात यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) जरी भारताच्या पहिल्या डावात काही मोठी खेळी करू शकला नाही. तो 27 चेंडूत 12 धावा करून दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जान्सन याच्या चेंडूवर बोल्ड झाला. त्याने आपल्या छोट्या डावामध्ये तीन चौकार मारले. पण फक्त 12 धावा करूनही यशस्वीने एक मोठी कामगिरी साध्य केली आहे.
50 कसोटी डावानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत यशस्वी जयस्वालने (Yashavi jaiswal breaks Sachin Tendulkar) सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे.
50 कसोटी डाव पूर्ण केल्यानंतर यशस्वीने आपल्या करिअरमध्ये 2440 धावा केल्या आहेत, तर सचिन तेंडुलकरने आपल्या पहिल्या 50 कसोटी डावानंतर 2415 धावा केल्या होत्या.
भारताकडून 50 कसोटी डावानंतर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्या नावावर आहे. गंभीरने 50 डावानंतर 2492 धावा केल्या होत्या. या यादीत राहुल द्रविड़ (Rahul Dravid) दुसऱ्या आणि वीरेंद्र सहवाग (Virendra Sehwag) तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
50 कसोटी डावानंतर सर्वाधिक धावा (भारतीय खेळाडू)
2692 – गौतम गंभीर
२५४० – राहुल द्रविड
२५३५ – वीरेंद्र सेहवाग
2440 – यशस्वी जयस्वाल
2415 – सचिन तेंडुलकर
Comments are closed.