Vinod Tawde Bihar Election : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का? विनोद तावडे Exclusive
Vinod Tawde Bihar Election : नितीश कुमार पुन्हा पलटी मारणार का? विनोद तावडे Exclusive
नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएनं ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भाजपनं 94, जदयू यू 84, राष्ट्रीय जनता दल 25, लोकजनशक्ती पार्टी रामविलास 19, एमआयएम 6, राष्ट्रीय लोक मोर्चा 4, हम पार्टी 5, काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहे. तर, सीपीआय माले 2 जागांवर आघाडीवर आहे. बिहारमधील या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांनी एबीपी माझा सोबत संवाद साधला. विनोद तावडे यांनी हा विकासाचा विजय असल्याचं म्हटलं.याशिवाय मित्रपंक्षांमध्ये असलेल्या संवादाचा आणि समन्वयाचा विकास असल्याचंही तावडे म्हणाले.
Vinod Tawde : बिहार राजकारणासाठी अवघड राज्य : विनोत तावडे
नितीशकुमार आणि भाजपचं सरकार होतं, ते सरकार सोडून नितीशजी लालू प्रसाद यांच्यासोबत चालले होते. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वानं बिहार हे आपल्यासाठी महत्त्वाचं राज्य आहे, असं सांगितलं होतं. मी त्यावेळी हरियाणाचा प्रभारी होतो, तेव्हा मला पुढील काही वर्ष बिहारकडे लक्ष देण्यास सांगितलं होतं. बिहार हे राजकारणासाठी अवघड राज्य आहे. महाराष्ट्रातून आलेल्या माणसासाठी खूप अवघड आहे. नितीशकुमार का गेले होते याचा अभ्यास केला. इंडी आघाडीनं त्यांची केलेली फसवणूक , त्यामुळं त्यांना पुन्हा परत आणण्याचा पक्षानं केलेला प्रयत्न होता. टीम म्हणून आम्ही काम केलं. बिहारच्या जनतेनं जातीच्या पलीकडे जाऊन विकासावर मतदान केलं. हे सगळ्यात मोठं यश आमचं आहे, असं विनोद तावडे यांनी म्हटलं आहे.
Comments are closed.