मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेर आढळलेल्या संशयित बॅगेत कपडे आणि कागदपत्रे

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर एक संशियत बॅग आढळून आली. टर्मिनसच्या बाहेर असलेल्या बस स्टॉपवर ही बॅग आढळून आली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर परिसर सील करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हा प्रचंड वर्दळीचा परिसरात आहे. दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पूर्ण खबरदारी घेतली.

पोलिसांचे बॉम्ब शोथक नाशक पथकही बोलावण्यात आले होते. पोलिसांच्या देखरेखित संशयित बॅग उघडण्यात आली. या बॅगेत संशयास्पद असे काहीच नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. बॅगेत कपडे आणि काही कगदपत्रे पोलिसांना आढळून आली. आता पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

Comments are closed.