11 चौकार, 15 षटकारांसह फक्त 32 चेंडूत वैभव सूर्यवंशीने ठोकलं शतक! विरोधी संघासाठी ठरला डोकेदुखी
ACC मेन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2025 स्पर्धा दोहा येथे खेळली जात आहे. 14 नोव्हेंबरला भारत A विरुद्ध यूएई A यांच्यात सामना रंगला. भारत A संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात सलामी फलंदाज म्हणून उतरलेल्या वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) कमालची खेळी केली. त्याने शतकी खेळी करत मैदानात धमाका केला. त्याने फक्त 32 चेंडूत शतक ठोकले.
शतक पूर्ण झाल्यानंतरही वैभव सूर्यवंशी थांबला नाही. त्याने 42 चेंडू खेळत 144 अशी झंझावाती खेळी केली. त्याच्या या डावात 11 चौकार आणि तब्बल 15 षटकारांचा समावेश होता.
त्याने 342.86 च्या स्ट्राइक रेटने तुफानी फलंदाजी केली. मात्र 12.3 षटकात मोहम्मद फराजुद्दीनने त्याला बाद केले.
Vaibhav Sooryavanshi is a superstar. Period. 🔥
📹 | टोन सेट करण्यासाठी आमच्या बॉस बेबीकडून एक स्टेटमेंट शतक 🤩
पहा #INDvUAE मध्ये #DPWorldAsiaCupRisingStars2025आता थेट सोनी स्पोर्ट्स नेटवर्क टीव्ही चॅनेल आणि सोनी LIV वर. #SonySportsNetwork #SonyLIV pic.twitter.com/K0RIoK4Fyv
— सोनी स्पोर्ट्स नेटवर्क (@SonySportsNetwk) 14 नोव्हेंबर 2025
भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 19 षटकांत 4 विकेटच्या बदल्यात 286 धावा केल्या आहेत. वैभव व्यतिरिक्त प्रियांश आर्य 6 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. तसेच नमन धीरने 23 चेंडूत 34 धावांची खेळी खेळली. नेहाल वढेराने 9 चेंडूत 14 धावा केल्या. तसेच जितेश शर्मा 30 चेंडूत 73 धावा करून नाबाद खेळत होता.
Comments are closed.