काँग्रेस पक्ष मुस्लिम लीग मावोवादी झालाय, त्यांच्याकडे व्हिजन नाही, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल


पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार निवडणूक निकाल 2025 वर : संपूर्ण देशाचे  लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल (Bihar Election Result 2025) जाहीर झाला आहे. आतापर्यंतच्या कलानुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीला भक्कम आघाडी मिळाली आहे. यानुसार बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेसजवळ कोणतेही सकारात्म व्हिजन नाही. काँग्रेस मुस्लिम लीग मावोवादी MMC)  झाली असल्याचा हल्लाबोल देखील मोदींनी केला.

काँग्रेसचे नकारात्मक राजकारण सहयोगी दलांना देखील बुडवत आहे

आज काँग्रेसच्या जवळ कोणतेही सकारात्म व्हिजन नाही. काँग्रेस मुस्लिम लिग मावोवादी (MMC)  झाली असल्याचा हल्लाबोल मोदींनी केला. काँग्रेसचा पूर्ण अजेंडा यावर चालत आहे. पुढच्या काळात काँग्रेसचा आणखी एक मोठे विभाजन होईल असे मोदी म्हणाले. काँग्रेसचे नकारात्मक राजकारण सहयोगी दलांना देखील बुडवत आहे. काँग्रेसचे नेते स्वत:सह इतरांना बुडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेसपासून सावधान राहा असा सल्ला देखील काँग्रेसच्या सहयोगी पक्षांना मोदी यांनी दिला.

बिहार वेगाने विकास करेल

आजचा विजय नवीन यात्रेची सुरुवात आहे. आमच्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. बिहार वेगाने विकास करेल. नवीन उद्योग येतील. बिहारच्या युवकांना बिहारमध्येच रोजगार मिळेल असे मोदी म्हणाले. जगाला बिहारचे नवीन स्वरुप पाहायला मिळेल.

तुमचा विश्वास हाच माझा प्राण

तुमचा विश्वास हाच माझा प्राण असेही मोदी म्हणाले. आपली आशा हाच माझा संकल्प आहे. आपली आकांक्षा माझी प्रेरणा आहे. सर्वजण मिळून समृद्ध आणि विकसीत बिहार करु. भाजपची ताकद भाजपचा कार्यकर्ता आहे. भाजपच्या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना जाते.

बिहारच्या या महान भूमीवर पुन्हा जंगलराज येणार नाही

एनडीएच्या नेतृत्वात बिहार पुढे जात आहे. बिहारच्या या महान भूमीवर पुन्हा जंगलराज येणार नाही. हा विजय त्या युवकांची आहे, ज्यांना काँग्रेस आणि लााल झेड्यांच्या लोकांनी बरबाद केले होते. बिहार विकासाच्या रस्त्याने पुढे जात आहे. आजचे निकाल हे विकासविरोधकांसाठी उत्तर आहे. या निकालाने निवडणूक आयोगावर असणाऱ्या विश्वासाला मजबूत केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

लोहास लोहा कणीस कापला! बिहार माहीम सारख्या बिहारच्या जनतेचे तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत

आणखी वाचा

Comments are closed.