दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची जोरदार सुरुवात! 5 खेळाडूंच्या चमकदार खेळीने आफ्रिकेचा डाव कोसळला

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 2 सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. तिचा पहिला सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जात आहे. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली. सुरुवातीला गोलंदाजांनी कमाल केली आणि दक्षिण आफ्रिकेला फक्त 159 धावांवर रोखले.

पहिल्या दिवशी भारताच्या पाच खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने आपल्या कारकिर्दीत 16 वा 5 विकेट हॉल मिळवला. तसेच मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. केएल राहुलने पहिल्या दिवसाचा शेवटपर्यंत 13 धावा बनवल्या आणि नाबाद राहिला. त्याचबरोबर भारतीय कर्णधार शुबमन गिलनेही उत्कृष्ट कर्णधार म्हणून कामगिरी केली.

या पाच भारतीय खेळाडूंनी मिळून दक्षिण आफ्रिकेच्या संघाची चांगलीच धुलाई केली.

Comments are closed.