J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
J. P. Nadda Delhi Speech मोदींची हॅट्रीक,बिहारच्या विजयानंतर जे. पी नड्डा यांचं भाजप मुख्यालयात भाषण
बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी बातमी…
बिहारचा रणसंग्राम एकतर्फी जिंकण्यात एनडीएला यश आलंय…बिहारमध्ये एनडीए सदाबहार आणि महागठबंधनची महाहार असं म्हणावं लागेल…२४३ जागांपैकी २०३ जागा मिळवत भाजप, जेडीयू, लोजप या पक्षांनी एकतर्फी बाजी मारत एनडीएला बहुमत मिळवून दिलंय….२४३ जागांच्या बिहार विधानसभेत बहुमताचा आकडा १२२ चा आहे… या निवडणुकांमध्ये एनडीएनं जोरदार मुसंडी मारत एकतर्फी विजय मिळवलाय…भाजपला ८९ तर जेडीयूनं ८५ जागा मिळवल्यात…तर काँग्रेसला अवघ्या ६ आणि तेजस्वी यादवांच्या राजदला २५ जागांवर समाधान मानवं लागतंय… बिहारच्या या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना अँटी-इन्कम्बन्सीचा फटका अजिबात बसला नाही. विरोधकांनी अगदी पहिल्यापासून केलेल्या मतचोरीच्या आरोपांचाही कोणताही परिणाम बिहारच्या निकालांवर झालेला दिसत नाही…..
Comments are closed.