सोरायसिससाठी प्रभावी औषधाचे आगमन

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

सोरायसिस या त्वचाविकारावर प्रभावी औषध आता भारतातही उपलब्ध होत आहे. सन फार्मा या कंपनीने सोमवारी या औषधाचे भारतात लाँचिंग केले आहे. हे औषध अमेरिकेसह 35 देशांमध्ये यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आले आहे. हे औषध आता भारतातही उपलब्ध करण्यात आले आहे, अशी घोषणा कंपनीने केली आहे या औषधाचे नाव इल्युम्या (टिलड्राकिझुमाब) असे आहे.

हे औषध मध्यम ते गंभीर प्रमाणातील सोरायसिसवर उपयुक्त आहे. ते दीर्घकाळ चांगला परिणाम दाखविणारे आणि अधिक प्रभावशाली आहे, असे कंपनीचे प्रतिपादन आहे. या औषधाने सोरायसिची लक्षणे प्रदीर्घ काळासाठी लुप्त होऊ शकतात. ज्या रुग्णांना मध्यम ते गंभीर प्लेक सोरायसिसचे व्यवस्थापन करताना अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी हे औषध रामबाण आहे, अशी माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कीर्ती गणोसकर यांनी लाँचिंगनंतर बोलताना दिली आहे.

कर्करोगावर सुलभ उपचार

भारतात कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. लोकांची जीवनशैली आणि आहार यात मोठे परिवर्तन झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. भारतातील प्रसिद्ध औषध कंपनी ल्युपिनने कॅन्सरवर सहजगत्या उपयोगात आणता येईल, असे एक औषध निर्माण केले असून या औषधाला अमेरिकेच्या औषध नियंत्रण प्राधिकरणाने मान्यता दिली आहे, अशी घोषणा कंपनीने सोमवारी केली आहे. हे औषध इन्जेक्शनच्या स्वरुपात आहे. त्याला अमेरिकेच्या ‘फूड अँड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन’ या प्रशासकीय प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. हे औषध काही प्रकारांच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी असल्याचे प्रतिपादन कंपनीकडून करण्यात आले आहे.

Comments are closed.