मालवणमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोकड सापडली, निलेश राणे आक्रमक, पोलिसांना फैलावर घेतले
मालवण नगर परिषद निवडणूक गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि भाजप नेत्यांमधील संघर्षामुळे चर्चेत असलेल्या मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या (Malavan Nagarparishad Election) मतदानापूर्वीची रात्रही वादग्रस्त ठरली. मालवणध्ये सोमवारी मध्यरात्री नाकाबंदीत एक कार सापडली. या कारमध्ये दीड लाखांची रोकड सापडली. ही कार भाजप (BJP) स्थानिक पदाधिकाऱ्याची होती. शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि निलेश राणे यांनी यानंतर भाजपकडून पैसे वाटप सुरु असल्याचा आरोप केला. त्यामुळे काल मध्यरात्री वातावरण प्रचंड तापले होते.
प्राथमिक माहितीनुसार, मालवणमध मध्यरात्री नाकाबंदीत मालवण पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या गाडीत रोख रक्कम पकडली. 10 वाजता प्रचार संपल्या मध्यरात्री पोलिसांच्या नाकाबंदी वेळी देवगड भाजपा तालुका अध्यक्ष महेश नारकार यांच्या MH-07- AS-6960 या कार मध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळून आली. मालवण पोलिसांनी सदर वाहन अधिक तपासासाठी मालवण पोलीस स्थानकात आणले असता मालवण येथील भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा परब आणि अजिंक्य पाताडे यांनी नंबर प्लेट नसलेली कार घेऊन पोलीस ठाण्यात येऊन सदर प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेचे आमदार निलेश राणे मालवण पोलीस ठाण्यात दाखल होत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातुन मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला.
एका पांढऱ्या कारमध्ये पोलिसांच्या पथकाला ही रोकड आढळून आली. भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर, आदित्य पाताडे आणि बाबा परब यांच्याकडे ही रोकड सापडल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला. मी पोलीस ठाण्यात जाईपर्यंत पोलिसांनी तक्रारही दाखल केली नव्हती. हे प्रकरण मिटवण्यासाठी सिंधुदुर्ग भाजप उपाध्यक्षांनी पोलिसांसोबत तडजोड केल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला.
नाकाबंदीमध्ये स्पेशल स्क्वॉडने गाडी पकडली. त्यांना गाडीत दीड लाख मिळाले. ही गाडी भाजपचे देवगड तालुका अध्यक्ष महेश नारकर यांची आहे. प्रचाराची आचारसंहिता रात्री 10 वाजताची होती. हे रात्री बारा वाजता पोलिसांच्या हाती लागले. तुम्ही पथक पाठवले. आमच्या मुलांना सांगितले तुम्ही कॅमेरा घेऊन आत येऊ शकत नाही. मी त्यांना आत जाऊ नका सांगितले. लाईट बंद करुन पोलीस काय करत होते. तुम्ही रात्री 12 वाजून 10 मिनिटांनी गाडी पोलीस स्टेशनला आणली, मी सव्वा वाजता पोलीस ठाण्यात आलो, तोपर्यंत काहीच कारवाई झाली नव्हती. पंचनामा झाला नव्हता, निवडणूक अधिकारी आले नव्हते. मी आल्यानंतर निवडणूक अधिकारी आले. भाजपच्या लोकांना जो सोडवायला आला होता, त्या गाडीला कोणतीही नंबरप्लेट नव्हती. या गाडीच्या आतमध्ये भाजपचा गमछा होता. या गाडीवर कारवाई करावी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
आणखी वाचा
मतदानाला अवघे काही तास, हिंगोलीत कारमध्ये सापडलं घबाड; पोलिसांकडून मोठी रक्कम जप्त, तपास सुरू
आणखी वाचा
Comments are closed.