लवकरच स्मृती मानधनासोबत लग्न…. पलाश मुच्छल पहिल्यांदाच कॅमेरासमोर; आईची रिअ‍ॅक्शन व्हायरल


स्मृती मानधना पलाश मुच्छाल विवाह: भारताची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना आणि म्युझिक कम्पोजर पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. स्मृति मानधना (Smriti Mandhana) आणि पलाश मुच्छल (Palash Muchhal) यांचा विवाह पुढे ढकलल्यानंतर पहिल्यांदाच पलाश सार्वजनिक ठिकाणी दिसला. सोमवार 1 डिसेंबर रोजी तो मुंबई विमानतळावर (Palash Muchhal was spotted at Mumbai airport) स्पॉट झाला. यापूर्वी पलाशच्या मानसिक स्थितीबाबत विधान करणाऱ्या त्याची आई अमिता मुच्छल यांनी नुकतेच आणखी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, लग्न लवकरच होऊ शकते. मात्र, विमानतळावर पलाश किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी माध्यमांशी कोणतीही चर्चा केली नाही.

23 नोव्हेंबरला होणारं लग्न अचानक पुढे ढकललं…. (Smriti Mandhana Palash Muchhal Wedding)

23 नोव्हेंबरला स्मृति आणि पलाश यांचे लग्न ठरले होते. पण लग्नाच्या आदल्या दिवशीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत बिघडल्याचा खुलासा झाला आणि लग्न स्थगित करण्यात आले. त्यानंतर पलाशवर काही आरोपही लागले, काही चॅटचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले. याचदरम्यान पलाश हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाल्याची माहिती समोर आली. आता मात्र तो पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी दिसला असून, त्याची आई दिलेले नवे विधान चर्चेत आहे.

विमानतळावर पलाशची शांत एन्ट्री

विमानतळावर पलाश नेहमीसारख्या हसऱ्या, उत्साही अंदाजात दिसला नाही. स्मृतीसोबत किंवा मीडियाशी तो नेहमीच मजेत बोलताना दिसत असतो, पण या वेळेस तो गंभीर आणि शांत जाणवत होता. काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये तो दिसला आणि त्याच्या हातात एक पुस्तक होते. मीडियाला त्याने पाहिले, पण काहीही न बोलता पुढे निघून गेला. त्याच्यासोबत त्याची आई आणि इतर कुटुंबीयही होते.


“लग्न खूप लवकर होईल…” – अमिता मुच्छल

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना अमिता मुच्छल म्हणाल्या की, “स्मृती आणि पलाश दोघेही सध्या कठीण काळातून जात आहेत. पलाशने आपल्या पत्नीबरोबर घरी परतण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मीही तिच्या स्वागतासाठी खास तयारी केली होती. सगळं ठीक होईल… आणि लग्न खूप लवकर होईल.” विमानतळावर पलाश दिसल्यानंतर त्याच्याकडून मात्र कोणताही अधिकृत प्रतिसाद आलेला नाही.

हे ही वाचा –

Hardik Pandya IND vs SA : दुखापतीनंतर धमाका करण्यासाठी पठ्ठ्या सज्ज! फिटनेस टेस्ट पास, BCCI टी-20 संघात देणार संधी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कधी होणार संघाची घोषणा?

आणखी वाचा

Comments are closed.