सुष्मिता सेनच्या आईने खरेदी केले दोन फ्लॅट

बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिची आई शुभ्रा सेन यांनी गोरेगावमधील ओबेरॉय रियल्टीच्या प्रोजेक्ट इलिसियनमध्ये दोन लक्झरी फ्लॅट खरेदी केले आहे. या फ्लॅटची किंमत 16.89 कोटी रुपये आहे. पहिला लक्झरी फ्लॅट 8.40 कोटी रुपयात खरेदी केला असून हा 1760 फूट आहे. यात एक पार्किंग देण्यात आली आहे. या फ्लॅटसाठी 42.02 कोटी रुपयांची स्टँम्प डयुटी आणइ 30 हजारांचे नोंदणी शुल्क मोजले आहे. दुसरा फ्लॅट 8.49 कोटी रुपयात खरेदी केला असून हा फ्लॅट सुद्धा 1760 वर्ग फूट आहे. यातही एक पार्किंग दिली आहे. यासाठी 42.49 लाख रुपयांची स्टँम्प डयुटी आणि 30 हजारांचे नोंदणी शुल्क मोजले आहे. शुभा सेन या व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर आहेत.

Comments are closed.