Secrets of Long Life: …म्हणून १०० वर्षे जगतात माणसं; हे आहे गुपित !
आपल्या आजूबाजूला अनेक वडीलधारी मंडळी पाहायला मिळतात. त्यातील बरेच जण अगदी वयाचे १०० वर्षे पूर्ण करतात. तेव्हा विचार येतो, त्यांच्या आरोग्याचं नेमकं रहस्य काय? खरं तर १०० वर्षांचं हे आयुष्य काही औषधोपचार करून नव्हे तर काही चांगल्या सवयींमुळे सुनिश्चित होतं.
अलीकडेच एक अभ्यास करण्यात आला, त्यात असं आढळून आलं की सध्या भारतातील पुरुषांचे आयुर्मान अंदाजे ७०-७१ वर्षे आणि महिलांचे ७३-७४ वर्षे आहे. त्यातच १०० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांच्या आरोग्याबद्दल सांगण्यात आलं. अभ्यासात असं दिसून आलं आहे की दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्याचे गुपित हे महागड्या औषधांमध्ये नाही तर आहारात आणि जीवनशैलीत दडलेलं आहे. ( These habbits can helps a person to live long and healthy life )
वजनावर नियंत्रण
अभ्यासात असं दिसलं आहे की, १०० वर्षे वय असलेल्या ५५.५ टक्के लोकांचा BMI म्हणजेच बॉडी मास इंडेक्स सामान्य होता, तर ४१ टक्के लोकांचे वजन कमी होते. तसेच ९१ टक्के पेक्षा जास्त लोकांचा कंबरेचा घेर सामान्य होता.
आजार
या लोकांमध्ये संधिवात, मधुमेह आणि हृदयरोगसारखे गंभीर आजार देखील आढळले नाहीत. तर मधुमेहाचे केवळ १.७ टक्के रुग्ण होते.
जीवनशैलीत करा हे बदल
दीर्घायुष्य हे जीवनशैलीतील चांगल्या सवयींशी जोडलेलं आहे. अभ्यासात सहभागी ९० टक्के पेक्षा जास्त लोकांनी कधीही मद्यपान केलेले नव्हते. तर जवळजवळ ६८ टक्के लोकांनी कधीही गुटखा, तंबाखूचं सेवन केलेलं नव्हतं.
या अभ्यासानंतर तज्ञांनी काही निष्कर्ष समोर आणले आहेत. त्यांनी शहरांमध्ये राहणाऱ्या तरुणांमध्ये निरोगी आहार आणि सक्रिय जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले आहे. आता सक्रिय जीवनशैली म्हणजे कमी चरबीयुक्त पदार्थ खाणे, साखर आणि मीठाचे सेवन नियंत्रित ठेवणं, धूम्रपान आणि मद्यपान टाळणं आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या सवयींचा समावेश आहे. अभ्यासातून एकच बाब समोर आली आहे की, दीर्घ आयुष्य हे काही महागडे उत्पादने, औषधोपचार करून मिळत नाही तर त्यासाठी साध्या, सोप्या आणि आरोग्यदायी सवयी पाळणे गरजेचं आहे.
Comments are closed.