नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन धडाधड बंद पडल्या, अपक्षचं बटणच दाबलं जाईन


महाराष्ट्र निवडणूक 2025: महाराष्ट्रातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यातील 264 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी संपूर्ण मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे. तसेच मतदान केंद्रांवर पोलिसांमार्फत पुरेशा बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. बहुतांश ठिकाणी सकाळी 7: 30 वाजतापासून मतदानास सुरुवात झाली असून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान सांयकाळी 5:30 पर्यंत मतदानाची वेळ असणार आहे. तर या निवडणुकांची मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी बुधवारी होणार आहे. असं सगळं असताना राज्यातील अनेक मतदान केंद्रावर प्रशासनाचा सावळा कारभार बघायला मिळाला आहे. अनेक ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होताच EVM मशीन बंद पडल्याचे बघायला मिळाले आहे. त्याचा फटका आता मतदारांना आणि एकंदरीत प्रक्रियेवर होणार आहे.

Mohol : मोहोळच्या नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगरपरिषद येथील नेताजी प्राशाळेत EVM मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धा तासापासून मतदान प्रक्रिया बंद आहे. सध्या कर्मचाऱ्याकडून मतदान मशीन सुरु करण्याचे प्रयत्न सुरूय. फक्त या तांत्रिक बिघाडाचा फटका मतदारांना सहन करावा लागतो आहे. परिणामी लोकं मशीन सुरु होण्यासाठी प्रतीक्षा करत रांगेत थांबलेत.

आणखी वाचा

Comments are closed.