इंडिगोच्या विमानात आत्मघातकी बॉम्ब हल्ल्याची धमकी, कुवैत-हैदराबाद विमानाचं मुंबईत इमर्जन्सी लँडिंग

कुवैतहून तेलंगणातील हैदराबाद शहराकडे जाणारे इंडिगोच्या विमानाचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान हवेतच उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. विमानामध्ये मानवी बॉम्ब असल्याचा ई-मेल आला होता. त्यानंतर कुवैत-हैदराबाद विमानाचे मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. विमान सुरक्षित उतरवल्यानंतर सुरक्षा यंत्रणा विमानाची तपासणी करत आहेत. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
कुवेत-हैदराबाद इंडिगो विमानात बॉम्बची धमकी दिल्यानंतर मुंबई विमानतळावर आपत्कालीन लँडिंग. अधिक तपशीलांची प्रतीक्षा आहे.
— ANI (@ANI) 2 डिसेंबर 2025

Comments are closed.