९० वर्षांच्या आईसोबत घडतंय!

काँग्रेसच्या बैठकीला गैरहजर राहिल्यावर थरूरांचे स्पष्टीकरण

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी काँग्रेसच्या महत्त्वाच्या रणनीतिक बैठकीला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे. मी जाणूनबुजून बैठक टाळलेली नाही. बैठकीवेळी मी विमानात होतो आणि केरळमधून दिल्लीत परतत होतो असे थरूर यांनी बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल सांगितले आहे. काँग्रेसची बैठक रविवारी पार पडली होती आणि याचे अध्यक्षत्व सोनिया गांधींनी केले होते. या बैठकीला थरूर उपस्थित न राहिल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहे.

शशी थरूर यांनी यापूर्वी काँग्रेसच्या ‘एसआयआ’वरून झालेल्या बैठकीतही भाग घेतला नव्हता. आपली प्रकृती बरी नव्हती असे त्यांनी त्यावेळी सांगितले होते. शशी थरूर यांच्या कार्यालयानुसार रविवारी ते स्वत:च्या 90 वर्षीय आईसोबत विमानातून प्रवास करत होते. अशास्थितीत दिल्लीत ते वेळेत पोहोचणे अवघड होते. याचबरोबर काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल देखील बैठकीत सामील होऊ शकले नव्हते. वेणुगोपाल हे केरळच्या स्थानिक निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र होते अशी माहिती पक्षाकडून देण्यात येत ओ.

वेणुगोपाल यांची अनुपस्थिती सामान्य राहिली, परंतु थरूर यांच्यावरून चर्चांचे रण पेटले आहे. थरूर हे सातत्याने काँग्रेसच्या अनेक बैठकांपासून दूर राहिल्याने ही चर्चा रंगत असल्याचे मानेल जात आहे. काँग्रेसच्या ‘एसआयआर’ विषयक बैठकीत ते सामील झाले नव्हते, परंतु त्याच्या एक दिवस आधी ते पंतप्रधान मोदींसोबत एका कार्यक्रमात उपस्थित होते. याचबरोबर सोशल मीडियावर थरूर यांनी केलेल्या पंतप्रधानांच्या कौतुकावरून काँग्रेसची केंडी झाली होती.

Comments are closed.